बिहारमध्ये कावड यात्रेत भीषण अपघात, डीजे ट्रॉलीला विजेचा धक्का, ९ जणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 08:28 AM2024-08-05T08:28:25+5:302024-08-05T08:45:10+5:30

बिहारमध्ये श्रावणातील तिसऱ्या सोमवारी मोठी दुर्घटना घडली आहे. ट्रॅक्टर-ट्रॉलीला लावलेल्या डीजेला हाय टेंशन वायरचा धक्का बसला, त्यामुळे आठ कावडीयांचा मृत्यू झाला.

Fatal accident in Kavad Yatra in Bihar DJ trolley electrocuted, 9 people died on the spot | बिहारमध्ये कावड यात्रेत भीषण अपघात, डीजे ट्रॉलीला विजेचा धक्का, ९ जणांचा जागीच मृत्यू

बिहारमध्ये कावड यात्रेत भीषण अपघात, डीजे ट्रॉलीला विजेचा धक्का, ९ जणांचा जागीच मृत्यू

बिहारमध्ये आज मोठी दुर्घटना घडली. श्रावणातील तिसऱ्या सोमवारी जलाभिषेक करण्यासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला हाय टेंशन वायरचा धक्का लागला, या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला. यावरुन आता विद्युत विभागावर निष्काळजीपणाचा आरोप केला असून एसडीएम आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचताच ग्रामस्थांनी गोंधळ सुरू केला.

वक्फ बोर्ड म्हणजे काय रे भाऊ..., जाणून घ्या अधिकार, मोदी सरकार का आणतंय विधेयक?

मिळालेल्या माहितीनुसार, हाजीपूर औद्योगिक पोलीस स्टेशन हद्दीतील सुलतानपूर येथे हा अपघात झाला.  इथे श्रावण महिन्यात गावातील मुलं दर सोमवारी जवळच्या हरिहरनाथ मंदिरात जलाभिषेक करायला जात असतात. रविवारी रात्री मुलं जलाभिषेकासाठी बाहेर पडली होती. या मुलांनी प्रवासासाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीवर डीजेचीही व्यवस्था केली होती. या गावातील रस्ता खराब असल्याने ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्यावरून जाणाऱ्या हाय टेंशन लाइनला धक्का लागला. विद्युत प्रवाहामुळे ट्रॉलीवर बसलेली मुलांना विजेचा धक्का बसला. यामुळे ८ जणांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मुळताच पोलीस दाखल झाले. यावेळी स्थानिकांनी विद्युत विभागावर गंभीर आरोप केले.  वीज विभागाचा निष्काळजीपणा अपघाताला कारणीभूत ठरल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून अपघातानंतर सातत्याने माहिती देऊनही वीज विभागाने कोणतीही कारवाई केली नाही.पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी आल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत मृतदेह घटनास्थळीच होते.

विद्युत कर्मचाऱ्यांनी दखल घेतली नाही

स्थानिकांनी दिलेली माहिती अशी, ही घटना घडल्यानंतर आम्ही परिसरातील इलेक्ट्रिशियनला फोन केला, पण कोणीही फोन उचलला नाही. आम्ही बोललो तेव्हा तो म्हणाला पोलिसांना सांगा. येथे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. 

Web Title: Fatal accident in Kavad Yatra in Bihar DJ trolley electrocuted, 9 people died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.