लडाखमध्ये LAC जवळ भीषण अपघात, टँकच्या सरावावेळी पाणी वाढलं, जेसीओसह ५ जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 12:09 PM2024-06-29T12:09:13+5:302024-06-29T12:11:44+5:30

दौलत बेग ओल्डी येथील भारतीय लष्कराचा तळ चीनच्या सीमेपासून अवघ्या २५ किमी अंतरावर आहे. या भागात पर्वत, नद्या आणि तलाव आहेत.

Fatal accident near LAC in Ladakh water rises during tank exercise, 5 army personnel drown | लडाखमध्ये LAC जवळ भीषण अपघात, टँकच्या सरावावेळी पाणी वाढलं, जेसीओसह ५ जवान शहीद

लडाखमध्ये LAC जवळ भीषण अपघात, टँकच्या सरावावेळी पाणी वाढलं, जेसीओसह ५ जवान शहीद

केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांसोबत मोठी दुर्घटना घडली आहे. लडाखमधील दौलत बेग ओल्डी भागात लष्कराचे जवान नदी ओलांडण्याचा सराव करत होते. यावेळी नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने लष्कराचे पाच जवान बुलाडे. भारतीय लष्कराच्या जवानांचा हा अपघात चीनच्या सीमेजवळ नियंत्रण रेषेजवळ घडला. दौलत बेग हे ओल्डी काराकोरम रेंजमध्ये वसलेले आहे, या ठिकाणी लष्कराचा तळ आहे.

लडाखमधील एलएसीजवळ अचानक आलेल्या पुरात लष्कराचे पाच जवान बुडाले. आर्मी टँक नदीचा खोल भाग ओलांडत असताना तिथे अडकला. यावेळी पाण्याची पातळी अचानक वाढल्याने ते पाण्याने भरले, त्यामुळे लष्कराचे जवान बुडाले. सध्या शोधमोहीम सुरू आहे. 

लडाखमध्ये LAC जवळ भीषण अपघात, टँकच्या सरावावेळी पाणी वाढलं, लष्कराचे ५ जवान बुडाले

अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, अपघातावेळी रणगाड्यात लष्कराचे पाच जवान होते. यामध्ये एक जेसीओ आणि चार सैनिकांचा समावेश आहे. एक जवान सापडला आहे, तर उर्वरित चार जवानांचा शोध सुरू आहे. दौलत बेग ओल्डी येथे ज्या रणगाड्याला अपघात झाला तो भारतीय लष्कराचा T-72 टँक होता. भारताकडे २४०० T-72 रणगाडे आहेत. भारतीय लष्कर अनेक वर्षापासून या रणगाड्यांचा वापर करत आहे. अपघाताच्यावेळी इतर अनेक टाक्याही तेथे उपस्थित होत्या.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करुन दु:ख व्यक्त केलं."लडाखमध्ये नदी ओलांडताना झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत आपल्या पाच शूर भारतीय सैन्याच्या जवानांना प्राण गमवावे लागल्याने अतिशय दु:ख झाले आहे. शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या संवेदना. देश खंबीरपणे उभा आहे. या दु:खाच्या काळात त्यांच्यासोबत आहे."

Web Title: Fatal accident near LAC in Ladakh water rises during tank exercise, 5 army personnel drown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.