जम्मू-काश्मीर मार्गावर भीषण अपघात; टँकचरच्या धडकेत १ जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 08:50 AM2024-03-02T08:50:33+5:302024-03-02T08:53:49+5:30

जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील मौद पासीजवळील टेकडीवर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली

Fatal accident on Jammu-Kashmir route; One was killed on the spot after being hit by a tank | जम्मू-काश्मीर मार्गावर भीषण अपघात; टँकचरच्या धडकेत १ जागीच ठार

जम्मू-काश्मीर मार्गावर भीषण अपघात; टँकचरच्या धडकेत १ जागीच ठार

उधमपूर - रस्ते अपघातात गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. त्यातच, जम्मू-काश्मीर रोडवरील उधमपूरजवळ पहाटेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात हेकडीवरील रस्यावरुन जाणारा टँकर कठड्याला धडकल्याने एकाचा मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की, टँकरचा पुढील भाग चेंदामेंदा झाल्याचे दिसून येत आहे. 

जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील मौद पासीजवळील टेकडीवर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली. वाहतूक करणाऱ्या टँकरच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील मृत व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उधमपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागारात हलविण्यात आला. दरम्यान, पुढील तपास सुरू असल्याची माहिती उधमपूर पोलिसांनी दिली. 

Web Title: Fatal accident on Jammu-Kashmir route; One was killed on the spot after being hit by a tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.