ंंंंसभापतींचे भवितव्य ठरविणारा गण

By admin | Published: October 22, 2016 12:43 AM2016-10-22T00:43:43+5:302016-10-22T00:45:14+5:30

हळगाव : सर्वसाधारण महिला राखीव

The fate of the future | ंंंंसभापतींचे भवितव्य ठरविणारा गण

ंंंंसभापतींचे भवितव्य ठरविणारा गण

Next

हळगाव : सर्वसाधारण महिला राखीव
जामखेड : हळगाव गण सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. या गणातून निवडून येणारी महिला सभापतिपदाची दावेदार ठरण्याची शक्यता गृहीत धरून प्रमुख नेत्यांनी आपल्या सौभाग्यवतीला मैदानात उतरविण्यासाठी कंबर कसली आहे. त्यानुसार भेटीगाठी सुरू आहेत.
तालुक्यातील एक गट व दोन गण कमी झाल्याने पूर्वीच्या अरणगावऐवजी हा नवीन गण तयार झाला. गणात सर्वच पक्षांतील धुरंधर नेते, प्रमुख कार्यकर्ते असल्याने राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. जिल्हा बँकेचे संचालक व ज्येष्ठ काँग्रेस नेते जगन्नाथ राळेभात, जिल्हा परिषदेचे महिला बालकल्याण समितीच्या सभापती नंदा वारे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे, काँग्रेस नेते व माजी पं. स. उपसभापती अंकुशराव ढवळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. भास्कर मोरे, रायुकाँचे तालुकाध्यक्ष बापूराव ढवळे, भाजयुमोचे अध्यक्ष काशिनाथ ओमासे, बाजार समितीचे संचालक करण ढवळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किसनराव ढवळे, अरणगावचे सरपंच लहू शिंदे, माजी सरपंच संतोष निगुडे असे दिग्गज असल्याने या गणाचे महत्त्व वाढले आहे.
नव्या रचनेनुसार या गणात हळगाव, डोणगाव, अरणगाव, पारेवाडी, कवडगाव, गिरवली, हसनाबाद, पिंपरखेड, धानोरा, वंजारवाडी, बावी, फक्राबाद, खामगाव, पाटोदा, भवरवाडी, रत्नापूर, सांगवी, सरदवाडी, कुसडगाव, डिसलेवाडी, खांडवी, पाडळी अशी २२ गावे आहेत. या सर्वच गावांत प्रमुख चारही पक्षांचे नेते व कार्यकर्ते असल्यामुळे ग्रामपंचायत व सेवा संस्थेच्या निवडणुका चुरशीच्या होतात.
राजकीयदृष्ट्या हा सक्षम गण विकासाबाबतही प्रगतशील आहे. हळगावला खाजगी साखर कारखाना आहे. नव्यानेच येथे पालकमंत्री राम शिंदे यांनी शंभर एकरांत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय आणले आहे. पाणलोट अंतर्गत व जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठया प्रमाणावर कामे झाल्याने हा परिसर पाण्याने डबडबला आहे.
या भागात दहा वर्षांपासून काँग्रेसचे प्राबल्य आहे. विद्यमान सदस्य शरद कार्ले आहेत. त्यापूर्वी काँग्रेसचे अंकुशराव ढवळे उपसभापती झाले होते. दहा वर्षांपासून हा गण भाजपला हुलकावणी देतो. गेल्या निवडणुकीतील या गटातील भाजप उमेदवार राजश्री सूर्यकांत मोरे गणातील उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार आहेत. त्यांच्याखेरीज अमृता ढवळे, अनिता कार्ले, काँग्रेसकडून मंदाबाई राळेभात, राष्ट्रवादीकडून रत्नदीप फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा मोरे, पिंपरखेडच्या सरपंच कांचन ढवळे तयारीत आहेत. शिवसेना व मनसे या गणात ऐनवेळी उमेदवारी जाहीर करणार आहे.

Web Title: The fate of the future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.