कमाल! वडील, भावाला गमावलं, आईने मजुरी करून शिकवलं; लेकाने कष्टाचं सोनं केलं, झाला प्रोफेसर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 03:29 PM2023-06-24T15:29:15+5:302023-06-24T15:30:20+5:30
आईने मुलाची काळजी घेतली आणि मुलाला इतकं सक्षम केलं की आज ते कॉलेजमध्ये असिस्टेंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे.
राजस्थानच्या नागौरमधील जगदीश राम झींझा यांची प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. लहानपणापासूनच त्यांना समस्यांचा सामना करावा लागला. पाचवीत शिकत असताना वडिलांचं छत्र हरपलं. त्यानंतर आठवीत शिकत असताना त्यांनी मोठा भाऊ गमावला. म्हणजे लहानपणीच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण आईने मुलाची काळजी घेतली आणि मुलाला इतकं सक्षम केलं की आज ते कॉलेजमध्ये असिस्टेंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे.
जगदीश यांनी दिलेल्या माहितीनुसार, "लहानपणी वडील आणि भावाची साथ सुटली. आईने मला शेती आणि मजुरी करून शिकवलं. तिने मला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ दिली नाही. मी माझे शिक्षण सरकारी शाळेत पूर्ण केले आहे. मी आठवीपर्यंत गावातील सरकारी शाळेत शिकलो. गावापासून 8 किमी अंतरावर असलेल्या फरदोदमध्ये दहावीचे शिक्षण झाले आहे. नागौरमधील सेट किशनलाल कांकरिया या सरकारी येथे बारावी झालो. मिर्धा महाविद्यालयात बीएससी केलं आहे."
"2007 मध्ये रसायनशास्त्रात M. Sc आणि 2008 मध्ये BED, त्याच कॉलेजमधून NET JRF 3 वेळा आणि SET परीक्षा 2 वेळा उत्तीर्ण झाली. ट्युशन घेतले तसेच अनेक खासगी शाळांमध्ये शिकवण्याचं कामं केलं. जेणेकरून मी माझा खर्च स्वतः उचलू शकेन. याच दरम्यान मी 20 स्पर्धा परीक्षा दिल्या, ज्यात यश आणि अपयश असं दोन्ही आलं. मला कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर व्हायचे होतं."
कष्टाचं फळ मिळालं
2012 मध्ये द्वितीय श्रेणीतील शिक्षक भरतीमध्ये शिक्षक पदासाठी निवड झाली. 2012 मध्ये केंद्रीय विद्यालयात शालेय व्याख्याता पदासाठी निवड झाली पण जगदीश रुजू झाले नाहीत. 2012 मध्येच राजस्थान लोकसेवा आयोगाने घेतलेल्या शालेय व्याख्याता परीक्षेत त्यांची रसायनशास्त्र या विषयात निवड झाली. कोणतीही रजा न घेता विद्यार्थ्यांना शिकवत राहिले आणि परीक्षेची तयारी करत राहिले. 2014 मध्ये असिस्टेंट प्रोफेसर पदाची भरती झाली आणि 2017 मध्ये परीक्षा झाली. 2018 मध्ये पोस्टिंग झाली.
"आईने मला लढायला शिकवलं"
प्रथम भोपाळगड आणि नंतर जयल येथे शिक्षण घेतले आणि सप्टेंबर 2021 पासून, श्री बलदेवराम मिर्धा शासकीय महाविद्यालय, नागौर, जेथे ते रसायनशास्त्र विभागात असिस्टेंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. जगदीश सांगतात की, माझ्या आईने मला प्रत्येक कठीण प्रसंगात मदत केली आणि प्रत्येक परिस्थितीशी लढायला शिकवलं. जगदीश यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.