बापरे! मुलाने घरातून चोरले गहू, वडिलांनी दिली भयंकर शिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 14:37 IST2020-08-09T14:33:54+5:302020-08-09T14:37:24+5:30

मुलाने घरातून गहू चोरले म्हणून एका वडिलांनी त्याला भयंकर शिक्षा दिल्याची घटना घडली आहे.

father beat son in agra uttar pradesh police arrested him | बापरे! मुलाने घरातून चोरले गहू, वडिलांनी दिली भयंकर शिक्षा 

बापरे! मुलाने घरातून चोरले गहू, वडिलांनी दिली भयंकर शिक्षा 

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत. उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे देखील अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलाने घरातून गहू चोरले म्हणून एका वडिलांनी त्याला भयंकर शिक्षा दिल्याची घटना घडली आहे. संतापाच्या भरात वडिलांनी आपल्या मुलाला उलट टांगून बेदम मारहाण केली आहे. या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या आग्रा येथील मेवली या गावात ही घटना घडली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून वडिलांना अटक करण्यात आली आहे. गुड्डू खान असं आरोपी असलेल्या वडिलांचं नाव आहे. खान यांचा दहा वर्षांचा मुलगा रमजानी याने घरात ठेवलेले गहू चोरले आणि विकले. तसेच त्यातून मिळालेले पैसे खर्च केले. मुलाने घरातून गहू चोरल्याचं वडिलांना कळताच त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी मुलाला दोरीने बांधलं, घराबाहेर खिडकीजवळ उलटं टांगलं आणि बेदम मारहाण करायला सुरवात केली. 

मुलाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी देखील जमले. त्यांनी वडिलांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मारू नका असं सांगितलं. मात्र संतापाच्या भरात गुड्डू यांनी बेदम मारहाण सुरूच ठेवली. मारहाणीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. जमलेल्या लोकांनी मुलाची सुटका केली आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून वडिलांना अटक केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


महत्त्वाच्या बातम्या

घरापासून 15 किमी अंतरापर्यंत आता हेल्मेटची गरज नाही?, जाणून घ्या 'त्या' व्हायरल मेसेजमागचं सत्य

CoronaVirus News : शाळा सुरू करणं 'या' देशाला पडलं महागात; 11 जण पॉझिटिव्ह, 268 क्वारंटाईन

CoronaVirus News : 'पापड खाओ, कोरोना भगाओ' म्हणणारे मोदींचे मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

आत्मनिर्भर भारत! 101 संरक्षण उत्पादनांवर आयात बंदी; राजनाथ सिंहांची मोठी घोषणा

"देश जेव्हा जेव्हा भावूक झाला, त्यावेळी फाईल्स गायब झाल्या"

Breaking: विजयवाडामध्ये कोविड सेंटरला भीषण आग; 7 जणांचा मृत्यू

Web Title: father beat son in agra uttar pradesh police arrested him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.