रस्ते अपघातात वडिलांचा झाला मृत्यू, १३ व्याला कुटुंबियांनी दान केले ' हेल्मेट'

By admin | Published: March 22, 2016 09:37 AM2016-03-22T09:37:14+5:302016-03-22T09:40:06+5:30

स्वत:च्या आप्ताला रस्ते अपघातात गमावल्यानंतर इतरांवर ही वेळ येऊ नये म्हणून एका कुटुंबाने १३व्याला 'हेल्मेट'चे दान दिल्याची घटना भोपाळमध्ये घडली.

Father dies due to road accident, donates 13th family to 'helmet' | रस्ते अपघातात वडिलांचा झाला मृत्यू, १३ व्याला कुटुंबियांनी दान केले ' हेल्मेट'

रस्ते अपघातात वडिलांचा झाला मृत्यू, १३ व्याला कुटुंबियांनी दान केले ' हेल्मेट'

Next
>ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. २२ - स्वत:च्या आप्ताला रस्ते अपघातात गमावल्यानंतर इतरांवर ही वेळ येऊ नये म्हणून एका कुटुंबाने १३व्याला 'हेल्मेट'चे दान दिल्याची घटना भोपाळमध्ये घडली आहे. मध्य प्रदेशमधील सतना जिल्ह्यात राहणा-या राजेंद्र गुप्ता (वय ४९) हे ३ मार्च रोजी गाडीवरून जात असताना अपघात झाला आणि डोक्याला गंभीर इजा होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अशी वेळ इतर कोणावरही येऊ नये म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी 'ब्राह्मण भोज' देताना त्यांना पैसे वा वस्त्र देण्याऐवजी सुरक्षिततेचा उपाय असलेल्या ' हेल्मेट'चेच दान केले. 
किराणा मालाचे दुकान चालवणारे राजेंद्र गुप्ता ३ मार्चला त्यांच्या दुचाकीवरून बाहेर जात होते, मात्र त्याचवेळी त्यांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका कारची त्यांना जोरदार धडक बसली आणि ते खाली कोसळले. या अपघातात जखमी झालेल्या गुप्ता यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि सुमारे आठवडाभर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र ते कोमात गेले आणि ८ मार्च रोजी त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. 
सोमवार, २१ मार्च रोजी त्यांचा १३ वा होता, यावेळी ' ब्राह्मण भोज' देण्याची पद्धत असते. त्यामध्ये मृत व्यक्तीचे आवडते पदार्थ वा वास्तू दान केल्या जातात. मात्र गुप्ता कुटुंबियांनी असे न करता बाह्मणांना ३५ हेल्मेट्स दान केnr.
' जर त्या दिवशी माझ्या वडिलांनी हेल्मेट घातले असते तर आज त्यांचा जीव वाचला असता. आमच्यावर जशी वेळ तशी इतर कोणावरही येऊ नये अशी आमची इच्छा आहे, त्यामुळेच आम्ही या लोकांना हेल्मेट वाटण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांचे आयुष्य तरी थोड्याफार प्रमाणात सुरक्षित राहील' असे गुप्ता यांचा मोठा मुलगा विवेक याने स्पष्ट केले.
 

Web Title: Father dies due to road accident, donates 13th family to 'helmet'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.