हृदयद्रावक! मोठ्या हौसेने बापाने मुला-मुलीचं लग्न ठरवलं; 'त्यालाच' मृत्यूने गाठलं, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 12:04 PM2023-03-10T12:04:53+5:302023-03-10T12:14:00+5:30
दीपक आणि ज्योतीचा विश्वास बसत नव्हता की वडिलांचे निधन झाले आहे. दोघे भाऊ-बहीण एकमेकांना मिठी मारून रडत राहिले.
राजस्थानमधील नागौर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका व्यक्तीच्या मुला-मुलीचे लग्न एकाच दिवशी होते. लग्नाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी या व्यक्तीचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. घरामध्ये लग्नाची जोरदार तयारी जोरात सुरू होती. अशा स्थितीत कुटुंबीयांनी आपले दु:ख लपवून कशी तरी मुलाची वरात पाठवली आणि मुलीच्या वरातीचं स्वागत केले. दोघांचं लग्न झालं. मृत व्यक्तीच्या पत्नीचा यापूर्वीच मृत्यू झाला होता. आधी आई आणि नंतर वडिलांना अशा प्रकारे गमावल्यामुळे मुलांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जिल्ह्यातील डोगाना उपविभागातील चांदारुण गावात घडली. गावात राहणाऱ्या ओमप्रकाश जांगिड यांच्या मुलीचा आणि मुलाचा विवाह एकाच दिवशी होता. संगीताचा कार्यक्रम सुरू झाला. याच दरम्यान, ओमप्रकाश हे दुकानातून कपडे घेण्यासाठी स्कूटीने डेगाना येथे निघाले. ओमप्रकाश कपडे घेऊन घरी परतत होते. , सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गावाबाहेरील शाळेजवळ भरधाव वेगातील ट्रॅक्टरने त्यांच्या स्कूटीला धडक दिली. या अपघातात ओमप्रकाश गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या ओमप्रकाश य़ांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल केले. तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ओमप्रकाश यांच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना मिळाली. त्यानंतर मृतदेह शवागारात ठेवण्यात आला. अपघाताची माहिती घरातील इतर लोकांपर्यंत पोहोचू दिली नाही. वडिलांच्या मृत्यूबद्दल मुलगा आणि मुलीलाही सांगितलं नाही. ओमप्रकाश यांचा किरकोळ अपघात झाल्याचे कुटुंबीयांना सांगण्यात आले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुलगा दीपक याच्या लग्नाची वरात निघाली. तिथे मुलगी ज्योतीची वरात आली. दोघांचे लग्न झाले. मात्र, ज्योतीचे लग्न घरी झाले नसून मंदिरात झाले. लग्नाच्या विधीनंतर ज्योतीची पाठवणी करण्यात आली. सायंकाळी पाच वाजता मुलगी ज्योतीला घरी आणण्यात आले. यादरम्यान दीपकची वरातही आली आणि नव्या सुनेचा गृहप्रवेश झाला. मुलगा-मुलगी विवाहबद्ध झाल्यानंतर बुधवारी सायंकाळी ओमप्रकाश यांचा मृतदेह घरी आणण्यात आला. मृतदेह येताच घरात एकच खळबळ उडाली. दीपक आणि ज्योतीचा विश्वास बसत नव्हता की वडिलांचे निधन झाले आहे. दोघे भाऊ-बहीण एकमेकांना मिठी मारून रडत राहिले. यानंतर ओमप्रकाश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"