धक्कादायक! आई-वडिलांनी मुलाला कष्टाने वकील केलं पण त्यानेच पैशासाठी केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 01:50 PM2024-07-25T13:50:04+5:302024-07-25T13:51:06+5:30

मुलाने आणि सुनेने पैशाच्या लालसेपोटी आई-वडिलांना मारहाण केली. तसेच मुलाने दागिने आणि पैसे देखील लुटले आहेत.

father educated his son made lawyer today he attacked his parents looted-property | धक्कादायक! आई-वडिलांनी मुलाला कष्टाने वकील केलं पण त्यानेच पैशासाठी केली मारहाण

फोटो - hindi.news18

राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलाने आणि सुनेने पैशाच्या लालसेपोटी आई-वडिलांना मारहाण केली. तसेच मुलाने दागिने आणि पैसे देखील लुटले आहेत. सीकर जिल्ह्यातील जाजोद गावात ही घटना घडली आहे. याबाबत नारायण लाल आणि पत्नी गंगा देवी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे मुलगा, सून आणि नातवंडांनी मारहाण केल्याचं म्हटलं आहे. 

वृद्ध दाम्पत्याने त्यांचा मुलगा सोहन सिंह, सून सुमन देवी आणि नातवंडांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दाम्पत्याने दिलेल्या माहितीनुसार, मुलगा आणि सुनेने कपाटाच्या चाव्या हिसकावून २ लाख १० हजार रुपये, सोन्या-चांदीचे दागिने, महत्त्वाची कागदपत्रे आणि मोबाईल फोन काढून घेतला. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. नारायण सिंह यांचा मुलगा सोहन सिंह हा वकील आहे.

मुलगा सोहन लाल आणि सून सुमन देवी यांनी त्यांना अनेक वेळा मारहाण केली. त्यामुळे ते त्यांच्यापासून दूर राहतात. वृद्ध दाम्पत्याची अवस्था आता अशी झाली आहे की त्यांच्याच कुटुंबातील कोणीही त्यांना साथ देत नाही. गंगा देवी यांनी सांगितलं की, "माझे पती आणि मी आमच्या घरी काम करत असताना आमचा मुलगा सोहनलाल हा आला आणि त्याने वडिलांना मारलं."

"मी मध्यस्थी केली असता त्याने मलाही मारहाण केली. त्यानंतर त्याने आम्हा दोघांना एका जागी बसवलं. यावेळी कुटुंबातील इतरही सदस्य आले. त्या लोकांनी येताच आम्हालाही मारहाण करून घरात ठेवलेले पैसे, दागिने व महत्त्वाची कागदपत्रे काढून घेतली. मारहाणीमुळे पतीच्या तोंडातून रक्त येत होतं. त्यानंतर मी इतर नातेवाईकांना याबाबत माहिती दिली." news18 हिंदीने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: father educated his son made lawyer today he attacked his parents looted-property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.