काय सांगता? नवऱ्याच्या वडिलांनी नवरीच्या आईलाच पळवलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 11:39 AM2020-01-21T11:39:10+5:302020-01-21T11:39:29+5:30
नवऱ्या मुलाच्या वडिलांनी नवरी मुलीच्या आईला पळवून नेलं असं कोणी सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही पण हो हे खरं आहे.
सूरत - ठरलेलं लग्न अनेकदा काही कारणांमुळे ऐनवेळी तुटल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अनेकदा मानपान, हुंडा आणि इतर कारणांमुळे लग्न मोडतं. मात्र नवऱ्या मुलाच्या वडिलांनी नवरी मुलीच्या आईला पळवून नेलं असं कोणी सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही पण हो हे खरं आहे. घरचे लग्नाला होकार देत नाहीत त्यामुळे लग्नासाठी मुलामुलींनी घर सोडल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येतात. तसेच प्रेमविवाहासाठी पळून जाण्याचे अनेक किस्से ऐकायला मिळतात. मात्र नवऱ्याच्या वडिलांनी नवरीच्या आईलाच पळवल्याने एक लग्न तुटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या सूरतमध्ये फेब्रुवारी महिन्यात एक लग्न होणार होते. मात्र लग्न होण्यापूर्वी नवऱ्याच्या वडिलांनी नवरीच्या आईला पळवून नेल्याची अजब घटना घडली आहे. नवऱ्याचे वडील आणि नवरीची आई पूर्वीपासूनच एकमेकांना ओळखत होते. त्यांचं एकमेकांवर प्रेम असावं आणि म्हणून त्यांनी पळून जाऊन लग्न केल्याचा अंदाज कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सूरतमधील काटरगाम परिसरात राहणाऱ्या या तरुणाचे लग्न नवसारी येथे राहणाऱ्या एका तरुणीशी ठरले होते. लग्नाच्या एक महिन्यापूर्वी नवरीची आई अचानक बेपत्ता झाली. बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली. दरम्यानच्या काळात नवऱ्याच्या वडिलांनीही आपले घर सोडले. शोध घेतल्यानंतरही त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने नवऱ्याच्या कुटुंबीयांनी देखील नवऱ्याचे वडील बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, नवऱ्याचे वडील आणि नवरीची आई हे फार आधीपासूनच एकमेकांना ओळखत होते. तसेच तरुणपणी त्यांना लग्न करायचं होतं. पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतरही दोघांचा पत्ता न लागल्याने लग्न मोडलं आहे. फेब्रुवारीत होणाऱ्या लग्नासाठी दोन्ही कुटुंबांनी जय्यत तयारी सुरू केली होती. एक वर्षापूर्वीच हे लग्न जुळवण्यात आले होते. या लग्नाला तरुण आणि तरुणीची सहमती होती. मात्र आता नवऱ्याच्या वडिलांनी नवरीच्या आईलाच पळवल्याने दोन्ही कुटुंबांनी ठरलेले लग्न मोडण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Delhi Election : ...म्हणून केजरीवालांना दाखल करता आला नाही उमेदवारी अर्ज
Video: मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; ट्वविटरवरील 'त्या' व्हिडीओमुळे संताप
आंध्र प्रदेशच्या आता तीन राजधान्या, देशातील पहिलाच प्रयोग
Delhi Election : भाजपाला मोठा धक्का; शिवसेनेनंतर आणखी एका पक्षाने 21 वर्षांची साथ सोडली
शासकीय दस्तऐवजातही पाथरीच साईबाबांची जन्मभूमी असल्याची नोंद