बाबो! लेकाचा मृत्यू झाला... 70 वर्षांच्या सासऱ्याने 28 वर्षीय सुनेशी केलं लग्न; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 10:30 AM2023-01-27T10:30:50+5:302023-01-27T10:32:57+5:30

एका 70 वर्षीय व्यक्तीने आपल्या 28 वर्षीय सुनेशी मंदिरात लग्न केल्याची घटना समोर आली आहे.

father in law and daughter in law got married in uttar pradesh photo went viral on social media | बाबो! लेकाचा मृत्यू झाला... 70 वर्षांच्या सासऱ्याने 28 वर्षीय सुनेशी केलं लग्न; नेमकं काय घडलं?

बाबो! लेकाचा मृत्यू झाला... 70 वर्षांच्या सासऱ्याने 28 वर्षीय सुनेशी केलं लग्न; नेमकं काय घडलं?

googlenewsNext

उत्तर प्रदेशमध्ये एका 70 वर्षीय व्यक्तीने आपल्या 28 वर्षीय सुनेशी मंदिरात लग्न केल्याची घटना समोर आली आहे. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. या घटनेबाबत सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत. सासरे कैलाश यादव यांच्या पत्नीचे 12 वर्षांपूर्वी निधन झाल्याचे बोलले जात आहे. त्यांना चार मुले असून पूजाचा नवरा तिसरा मुलगा होता, त्याचाही मृत्यू झाला आहे. 

रिपोर्ट्सनुसार, दोघांनी परस्पर संमतीने लग्न केले आहे आणि पूजा तिच्या नवीन नात्यामुळे खूश आहे. कैलाश यादव हे बहलगंज कोतवाली भागातील छपिया उमराव गावचे रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. बरहलगंज पोलीस स्टेशनचे चौकीदार कैलाश यादव यांनी त्यांची सून पूजासह सप्तपदी घेतल्या आणि यावेळी गावकऱ्यांसह त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. या विवाहाबाबत परिसरात चर्चा सुरू आहे. 

पतीच्या निधनानंतर पूजा एकाकी पडल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. तिचे लग्न दुसऱ्या कोणाशी तरी झाले होते, पण तिला घर आवडले नव्हते म्हणून ती नवऱ्याच्या घरी परतली. तिने सासऱ्याशी लग्न करण्यास होकार दिला आणि समाजाची पर्वा न करता हे लग्न झाले. बरहलगंज पोलीस ठाण्यातील चौकीदार कैलाश यादव यांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून गाव आणि पोलीस ठाण्यात पोहोचली आहे. 

अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्हाला या लग्नाची माहिती व्हायरल होत असलेल्या फोटोवरूनच मिळाली आहे. याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही. ते म्हणाले की, हा दोन लोकांचा परस्पर संबंध आहे, कोणाची तक्रार असेल तर पोलीस तपास करू शकतात. सध्या या लग्नाची तुफान चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: father in law and daughter in law got married in uttar pradesh photo went viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न