Father-in-law's Property: सासऱ्याच्या संपत्तीवर जावयाचा हक्क? उच्च न्यायालयाचा महत्वाचा निकाल आला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 01:50 PM2023-01-28T13:50:00+5:302023-01-28T13:50:18+5:30
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल कुमार यांनी हा निकाल दिला. केरळच्या कन्नूर येथील तैलीपरंबा येथील रहिवासी डेव्हिस राफेलचे अपील फेटाळले आहे.
सासऱ्याच्या संपत्तीवर हक्क सांगणाऱ्या जावयांना धक्का देणारा निकाल आला आहे. केरळ उच्च न्यायालयाने एका प्रकरणात सासऱ्याच्या संपत्तीत जावयाला कोणाताही कायदेशीर अधिकार नसल्याचे म्हटले आहे. जावई सासऱ्याच्या संपत्तीत किंवा घरात हक्क सांगू शकत नाही, असे म्हटले आहे.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल कुमार यांनी हा निकाल दिला. केरळच्या कन्नूर येथील तैलीपरंबा येथील रहिवासी डेव्हिस राफेलचे अपील फेटाळले आहे. डेव्हिसने त्याचे सासरे हेन्ड्री थॉमस यांच्या मालमत्तेवर दावा केला होता. डेव्हिसला आपल्या मालमत्तेवर अतिक्रमण करण्यापासून आणि मालमत्ते हस्तक्षेप करणे आणि घराच्या शांतता बिघडविण्यापासून रोखण्यासाठी सासरा हेन्ड्रीने प्रतिबंधात्मक आदेश देण्याची विनंती कनिष्ठ कोर्टाकडे केली होती.
फादर जेम्स नाझरेथ आणि सेंट पॉल चर्चकडून ही मालमत्ता भेट म्हणून मिळाल्याचा दावा हेन्ड्रीने केला. त्यांनी स्वत:च्या पैशांतून पक्के घर बांधले असून ते तेथे कुटुंबासह राहत आहेत. या मालमत्तेवर आपल्या जावयाचा अधिकार नसल्याचा युक्तिवाद केला.
यावर डेव्हिस यांनी युक्तीवाद मालमत्तेची मालकी वादातीत आहे. ती चर्चच्या अधिकार्यांनी देणगीच्या कराराद्वारे कुटुंबाला दिली होती. हेंड्रीच्या एकुलत्या एक मुलीशी त्याचे लग्न झाले आहे. लग्नानंतर त्याला त्याच कुटुंबाने दत्तक घेतले आहे. म्हणून त्यालाया घरात आणि मालमत्तेमध्ये राहण्याचा अधिकार आहे. मात्र, उच्च न्यायालयाने त्याचे काहीच मान्य न करता सासऱ्याच्या मालमत्तेवर अधिकार नसल्याचा दावा केला आहे.
दोन्ही बाजू ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने सांगितले की, जावई हा सासरच्या कुटुंबातील सदस्य आहे हे सांगणे कठीण आहे. हेंड्रीच्या मुलीशी लग्न केल्यानंतर त्याला कुटुंबाने दत्तक घेतले होते हे सांगणेही जावयासाठी लाजिरवाणे आहे.