वडील सर्वोच्च न्यायालयात कूक, मुलगी अमेरिकेत घेणार कायद्याचे शिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 07:26 AM2024-03-14T07:26:31+5:302024-03-14T07:27:26+5:30

आपल्या कन्येचे कौतुक पाहून तिच्या वडिलांना गहिवरून आले.

father is a cook in the supreme court daughter will study law in america | वडील सर्वोच्च न्यायालयात कूक, मुलगी अमेरिकेत घेणार कायद्याचे शिक्षण

वडील सर्वोच्च न्यायालयात कूक, मुलगी अमेरिकेत घेणार कायद्याचे शिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयामधील कूक अजयकुमार सामल यांची कन्या तसेच कायदा शाखेतील संशोधक प्रज्ञा सामल हिला कायदा अभ्यासक्रमात अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी कॅलिफोर्निया विद्यापीठ किंवा मिशिगन विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्यातील एका विद्यापीठाची तिला निवड करायची आहे. प्रज्ञाने मिळविलेल्या यशाबद्दल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी तिचा सत्कार केला.

या सोहळ्यात प्रज्ञाच्या आईवडिलांचाही सत्कार करण्यात आला. या सोहळ्यात प्रज्ञाचे उपस्थितांनी कौतुक केले व तिला उभे राहून मानवंदना दिली. आपल्या कन्येचे कौतुक पाहून तिच्या वडिलांना गहिवरून आले.

Web Title: father is a cook in the supreme court daughter will study law in america

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.