भारताच्या हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचे निधन, महान कृषी शास्त्रज्ञ ९८व्या वर्षी अनंतात विलिन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 01:01 PM2023-09-28T13:01:38+5:302023-09-28T13:02:08+5:30

भारताचे प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांचे गुरुवारी निधन झाले.

Father of India's Green Revolution MS Swaminathan passes away, great agricultural scientist dies at 98 | भारताच्या हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचे निधन, महान कृषी शास्त्रज्ञ ९८व्या वर्षी अनंतात विलिन

भारताच्या हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचे निधन, महान कृषी शास्त्रज्ञ ९८व्या वर्षी अनंतात विलिन

googlenewsNext

भारताचे प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांचे गुरुवारी निधन झाले. तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे सकाळी ११.२० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९२५ रोजी झाला. स्वामीनाथ यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते.

"शेवटच्या श्वासापर्यंत थांबणार नाही"; फ्री ऑटो ॲम्ब्युलन्स चालवून वृद्धाने वाचवले शेकडो जीव

स्वामिनाथन हे कृषी विभागाचे शास्त्रज्ञ होते. १९७२ ते १९७९ या काळात त्यांनी 'भारतीय कृषी संशोधन परिषदे'चे अध्यक्ष म्हणूनही काम केले. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. स्वामीनाथन यांची गणना भारतातील महान कृषी शास्त्रज्ञांपैकी एक म्हणून केली जाते, त्यांनी भाताची अशी विविधता विकसित केली, ज्यामुळे भारतातील कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना अधिक धानाचे उत्पादन करता आले.

कृषी क्षेत्रात उच्च शिक्षण घेतले

एमएस स्वामीनाथन यांचा जन्म ७ ऑगस्ट १९२५ रोजी कुंभकोणम, तामिळनाडू येथे झाला. त्यांचे वडील एमके सांबशिवन हे सर्जन होते. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण कुंभकोणममध्येच झाले. त्यांच्या वडिलांचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा प्रभाव हे त्यांना शेतीत रस असण्याचे कारण होते. या दोघांमुळेच त्यांनी कृषी क्षेत्रात उच्च शिक्षण घेतले. ते आधी पोलिसात भरती होणार होते, १९४० मध्ये त्यांनी पोलीस अधिकारी होण्यासाठी परीक्षाही उत्तीर्ण केली होती. पण नंतर त्यांनी कृषी क्षेत्रात दोन बॅचलर डिग्री मिळवल्या.

कृषी शास्त्रज्ञ डॉ. स्वामीनाथन यांनी 'हरितक्रांती' यशस्वी करण्यासाठी दोन केंद्रीय कृषी मंत्री सी. सुब्रमण्यम (१९६४-६७) आणि जगजीवन राम (१९६७-७० आणि १९७४-७७) यांच्यासोबत काम केले. यामध्ये रासायनिक-जैविक तंत्रज्ञानाद्वारे गहू आणि तांदळाची उत्पादकता वाढवली. हरित क्रांतीमुळे भारताला धान्य क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या मार्गावर वाटचाल करता आली. हरित क्रांतीमुळे भारताचे चित्र बदलले. 

Web Title: Father of India's Green Revolution MS Swaminathan passes away, great agricultural scientist dies at 98

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.