वडील, मुलगा आणि मुलीची गोळ्या झाडून हत्या, बिहारमध्ये पकडौआ विवाहाचा भयानक शेवट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 01:08 PM2024-02-18T13:08:34+5:302024-02-18T13:12:21+5:30

Bihar Crime News: बिहारमधील काही भागात पकडौआ विवाह ही सामान्य बाब बनलेली आहे. मात्र या विवाह प्रकारावरून मोठ्या प्रमाणात वादही होत असतात. दरम्यान, या पकडौआ विवाहातून एक भयानक हत्याकांड घडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Father, son and daughter shot dead, Pagdaua marriage ends in horror in Bihar | वडील, मुलगा आणि मुलीची गोळ्या झाडून हत्या, बिहारमध्ये पकडौआ विवाहाचा भयानक शेवट

वडील, मुलगा आणि मुलीची गोळ्या झाडून हत्या, बिहारमध्ये पकडौआ विवाहाचा भयानक शेवट

बिहारमधील काही भागात पकडौआ विवाह ही सामान्य बाब बनलेली आहे. मात्र या विवाह प्रकारावरून मोठ्या प्रमाणात वादही होत असतात. दरम्यान, या पकडौआ विवाहातून एक भयानक हत्याकांड घडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. बिहारमधील बेगूसराय येथे २५ वर्षीय महिला, तिचे वडील आणि तिच्या भावाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. महिलेच्या सासरच्या मंडळींनी हे भयानक हत्याकांड घडवले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच घटनास्थळावर पोहोचलेल्या पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हे पकडौआ विवाहाचे एक प्रकरण असून, त्यामुळेच महिलेच्या सासरचे लोक तिला नांदवत नव्हते, असे गावच्या सरपंचांनी सांगितले. 

 याबाबत समोर येत असलेल्या अधिक माहितीनुसार ही घटना साहेबपूर कमाल ठाणे क्षेत्रातील विष्णूपूर आहुक गावातील आहे. मृतांची ओळख २५ वर्षीय निलू कुमारी, तिचे वडील उमेश यादव आणि भाऊ राजेश यादव यांच्या रूपात पटवण्यात आली आहे. हे सर्व जण बेगूसराय जिल्ह्यातील श्रीनगर परिसरातील रहिवासी होते. 

या घटनेबाबत साहेबपूर कमाल पोलीस ठाण्यातील एसएचओ दीपक कुमार यांनी सांगितले की, ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली. उमेश यादव हे त्यांची मुलगी निलू आणि मुलग्याला घेऊन मुलीच्या सासरी पोहोचले होते. ते सासरी पोहोचले तेव्हा सासरची मंडळी भडकली. तसेच प्रकरण हातघाईवर आले. याचदरम्यान, निलू कुमारीचे सासरे बंदूक घेऊन आले. त्यानंतर त्यांनी या तिघांवरही अगदी जवळून गोळीबार केला. या गोळीबारात सर्वांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. 

Web Title: Father, son and daughter shot dead, Pagdaua marriage ends in horror in Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.