भारीच! बँकेत नोकरी करून वडिलांनी 4 मुलांना शिकवलं; मुलांनी कष्टाचं सोनं केलं, झाले IAS-IPS

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 04:21 PM2022-12-24T16:21:36+5:302022-12-24T16:22:46+5:30

एका कुटुंबातील चार सदस्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. हे सर्वजण आयएएस आणि आयपीएस पदांवर कार्यरत आहेत.

father taught his 4 children by doing bank job all siblings passed upsc and became ias ips | भारीच! बँकेत नोकरी करून वडिलांनी 4 मुलांना शिकवलं; मुलांनी कष्टाचं सोनं केलं, झाले IAS-IPS

भारीच! बँकेत नोकरी करून वडिलांनी 4 मुलांना शिकवलं; मुलांनी कष्टाचं सोनं केलं, झाले IAS-IPS

googlenewsNext

प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. UPSC ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो जण या परीक्षेत आपलं नशीब आजमावत असतात. पण काहींनाच संधी मिळते. एकाच कुटुंबातील चार भाऊ-बहीण एकत्र या कठीण उत्तीर्ण झाल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील लालगंज जिल्ह्यात राहणाऱ्या एका कुटुंबातील चार सदस्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. हे सर्वजण आयएएस आणि आयपीएस पदांवर कार्यरत आहेत.

हे चौघे भावंड असून त्यात दोन भाऊ आणि दोन बहिणींचा समावेश आहे. त्यांचे वडील  बँक कर्मचारी आहेत. अनिल प्रकाश मिश्रा यांनी आपल्या मुलांच्या या यशाबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक असूनही त्यांनी मुलांच्या शिक्षणाबाबत कधीही तडजोड केली नाही. आपल्या मुलांना चांगल्या नोकऱ्या मिळाव्यात अशी त्यांची नेहमीच इच्छा होती. अशा परिस्थितीत मुलांनीही अभ्यासाकडे लक्ष दिले आणि मेहनतीपासून कधीच मागे हटले नाही.

चार भावंडांमध्ये सर्वात मोठे असलेले योगेश मिश्रा हे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी आपले शिक्षण लालगंज येथे पूर्ण केले आणि नंतर मोतीलाल नेहरू नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनियरिंग केलं. शिक्षण घेतल्यानंतर योगेश यांनी नोएडामध्ये नोकरी करत सिविल सर्व्हिसची तयारी केली. 2013 मध्ये त्यांच्या मेहनतीला फळ मिळाले आणि ते UPSC परीक्षा उत्तीर्ण झाले. योगेश यांच्यानंतर त्यांची बहीण क्षमा मिश्रा यांनीही त्यांच्यासारखी सिविल सर्व्हिस निवडली. 

पहिल्या तीन प्रयत्नात त्य़ा अपयशी ठरल्या पण तरीही त्यांनी हिंमत हारली नाही आणि चौथ्या प्रयत्नात त्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या. आता क्षमा आयपीएस अधिकारी आहेत. यानंतर दुसरी बहीण माधुरी मिश्रा लालगंज येथील महाविद्यालयातून पदवीधर झाल्या. प्रयागराजमधून मास्टर्स केल्यानंतर त्याने 2014 मध्ये UPSC परीक्षा दिली. आता त्या झारखंड केडरची आयएएस अधिकारी आहेत. चार भावंडांमधील दुसऱ्या भावाने 2015 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि अखिल भारतीय 44 वा क्रमांक मिळवला. आता ते बिहार केडरमध्ये कार्यरत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: father taught his 4 children by doing bank job all siblings passed upsc and became ias ips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.