मुलांच्या संरक्षणासाठी वडील बनले बंदूकधारी; भटक्या कुत्र्यांपासून करणार संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 09:15 AM2022-09-17T09:15:29+5:302022-09-17T09:15:38+5:30

आपल्या मुलांना मदरशात नेताना समीर यांनी सोबत बंदूक बाळगण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

Fathers become gunmen to protect children; Protection from stray dogs | मुलांच्या संरक्षणासाठी वडील बनले बंदूकधारी; भटक्या कुत्र्यांपासून करणार संरक्षण

मुलांच्या संरक्षणासाठी वडील बनले बंदूकधारी; भटक्या कुत्र्यांपासून करणार संरक्षण

Next

तिरुअनंतपुरम : केरळमध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास खूप वाढला आहे. त्यामुळे तेथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांवर हल्ले केल्याने पालक चिंतित आहेत. या राज्यातील कासारगोड येथे समीर या गृहस्थाने आपल्या मुलांना मदरशामध्ये नेताना सोबत बंदूक बाळगली असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांपासून मुलांना वाचविण्यासाठी त्यांनी हा उपाय योजला आहे.  

आपल्या मुलांना मदरशात नेताना समीर यांनी सोबत बंदूक बाळगण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. समीर म्हणाले की, मदरशात जाताना वाटेत अनेक भटकी कुत्री अंगावर येतात. त्यांनी मुलांवर हल्ला करू नये म्हणून मी सोबत बंदूक बाळगतो. समीर यांचा उपाय चुकीचा आहे असे काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे, तर काहींनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. कासारगोडमधील बेकाल भागात भटके कुत्रे माणसांना चावल्याच्या अनेक घटना घडल्याने लाेकांमध्ये दहशत  आहे. (वृत्तसंस्था)

बदलली भूमिका!
कोडिकोळच्या महापौर बीना फिलीप यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत भटक्या कुत्र्यांना ठार मारण्याच्या काही घटना उजेडात आल्या होत्या. अशा प्रकारे कोणत्याही प्राण्याला ठार मारण्याच्या कृतीचा मी निषेध केला होता. मात्र, मी या भूमिकेत बदल केला आहे. 
आता लहान मुलांवर भटके कुत्रे हल्ले करीत आहेत. त्याचा लोक प्रतिकार करीत आहेत. त्यामुळे सध्याच्या स्थितीत  लोकांना दोषी ठरविता येणार नाही.

भटक्या कुत्र्यांचा त्रास
केरळ राज्यात भटके कुत्रे व माणसे यांच्यातील संघर्ष वाढला आहे. गेल्या काही दिवसांत या कुत्र्यांनी लहान मुलांसहित इतर लोकांवरही हल्ले करण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. 

Web Title: Fathers become gunmen to protect children; Protection from stray dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.