फतवा! ट्रीपल तलाकला विरोध करणारी 'निदा खान मुस्लीम समाजातून बहिष्कृत'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 11:52 AM2018-07-17T11:52:55+5:302018-07-17T11:54:58+5:30
हलाला, ट्रीपल तलाक आणि बहुविवाह प्रथेस विरोध करणाऱ्या बरेलीतील निदा खानविरुद्ध फतवा जारी करण्यात आला आहे. इस्लामिक कायद्याला विरोध केल्याचा आरोप निदावर ठेवण्यात आला.
नवी दिल्ली - हलाला, ट्रीपल तलाक आणि बहुविवाह प्रथेस विरोध करणाऱ्या बरेलीतील निदा खानविरुद्ध फतवा जारी करण्यात आला आहे. इस्लामिक कायद्याला विरोध केल्याचा आरोप निदावर ठेवण्यात आला असून तिला मुस्लीम समाजातून बहिष्कृत करण्यात आले आहे. याबाबत बरेतील इमाम मुफ्ती खुर्शीद आलम यांनी दर्गाह परिसरात माहिती दिली. दर्गाहतील दारुल इफ्ता विभागाने निदाविरुद्ध फतवा जारी केल्याची खुर्शीद यांनी सांगितले.
दर्गाहमधून निदाविरुद्ध फतवा काढल्यानंतर तिचे अन्न-पाणीही बंद करण्यात आले आहे. या फतव्यानुसार निदा आजारी पडल्यास तिला औषधोपचार दिला जाणार नाही. तिच्या मृत्यूनंतर तिच्या पार्थिवासाठी नजमाही पडण्यात येणार नाही. एवढेच नसून तिला स्मशानभूमीत दफन करण्यासाठी जमिनही देण्यात येणार नसल्याचे या फतव्यात म्हटले आहे. निदाविरुद्ध हा फतवा जारी केल्यानंतर निदानेही पत्रकार परिषद घेऊन फतवा जारी करणाऱ्यांना चांगलेच सुनावले.
Nida Khan(triple talaq victim) has been ostracized from Islam because she has been regularly speaking against the religion and its practices. A fatwa has been issued against her: Khurshid Alam,Imam, Bareilly Jama Masjid pic.twitter.com/tx8JykhErr
— ANI UP (@ANINewsUP) July 16, 2018
भारत हा लोकशाही मानणारा देश आहे. येथे दोन कायदे कदापी चालणार नाहीत. एखाद्या मुस्लीम व्यक्तीला इस्लाममधून बेदखल करण्याचा अधिकार कोणालाही नाही, केवळ अल्लाच याचा न्याय करु शकतो. त्यामुळे फतवा काढणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे, असे निदा खानने म्हटले आहे. दरम्यान, 16 जुलै 2015 मध्ये निदाचा निकाह झाला होता. मात्र, 5 फेब्रुवारी 2016 रोजी त्यांचा तलाक झाला आहे. निदाचा निकाह आला हजरत खानदानातील उस्मान उर्फ रजा खाँ यांचे पुत्र शीरान रजा खाँ यांच्याशी झाला होता.