सोनं-चांदी आणि पैशाने भरलेलं कपाट; FCI घोटाळ्याप्रकरणी CBI ची मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 05:27 PM2023-01-11T17:27:23+5:302023-01-11T17:27:30+5:30
एफसीआय मधील घोटाळ्या प्रकरणी सीबीआयने आज कारवाई केली आहे. या प्रकरणी पंजाब, हरियाणा आणि दिल्लीतील ५० हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत.
एफसीआय मधील घोटाळ्या प्रकरणी सीबीआयने आज कारवाई केली आहे. या प्रकरणी पंजाब, हरियाणा आणि दिल्लीतील ५० हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. यात मोठा ऐवढ सीबीआयने जप्त केला आहे. सीबीआयने एफसीआयचे डीजीएम राजीव मिश्रा यांना अटक केली आहे.
केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने FCI उपमहाव्यवस्थापक (DGM) राजीव कुमार मिश्रा यांना लाच घेताना रंगेहात पकडले. यानंतर छापेमारी सुरू करण्यात आली. यामध्ये सीबीआयने आतापर्यंत ६० लाख रुपये जप्त केले आहेत. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी संबंधित घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने ७४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
"सीबीआय आणि एफसीआयचे अधिकारी आणि धान्य गिरण्यांच्या मालकांवर बऱ्याच दिवसांपासून लक्ष ठेवून होते. आज बुधवारी त्यांच्याविरोधात कारवाई सुरू केली. छापेमारीदरम्यान कारवाई केली. केंद्रीय तपास यंत्रणेने जप्त केले - वेगवेगळ्या ठिकाणांहून प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे जप्त केली. FCI मधील उपमहाव्यवस्थापक राजीव मिश्रा यांना ५०,००० रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे.
CBI raids are underway at more than 50 places including Punjab, Haryana, Delhi and Chandigarh in connection with the Food Corporation of India (FCI) scam case: CBI Official pic.twitter.com/RMAZsAF3vh
— ANI (@ANI) January 11, 2023
७४ आरोपींवर गुन्हा दाखल
या संपूर्ण प्रकरणात ७४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 'एफसीआयमधील कार्यकारी संचालकांना तांत्रिक सहाय्यकांची भूमिका एजन्सीच्या देखरेखीखाली आहे. पंजाब आणि हरियाणातील अनेक शहरे तसेच दिल्लीतील दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी केली जात आहे.