दिल्ली पोलिसांच्या अॅक्शनची भीती; रात्रभर बॉर्डरवर जागे राहिले शेतकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 08:43 AM2021-01-28T08:43:54+5:302021-01-28T08:45:31+5:30
Farmer Protest : दिल्लीमध्ये झालेल्या हिंसेनंतर शेतकरी संघटनांमध्ये फूट पहायला मिळत आहे. नोएडाच्या चिल्ला बॉर्डरवर शेतकरी संघटनेने भारतीय किसान युनियन (भानु) यांनी आंदोलन संपविण्याची घोषणा केली. मजदूर किसान युनियनने आंदोलनातून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर चिल्ला बॉर्डरवरील बॅरिकेड्स हटविण्यात आले आहेत.
नवीन कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकऱी आंदोलनामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास गाझीपूर बॉर्डरवर गोंधळाची स्थिती बनली होती. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. रात्री पोलिसांनी शेतकऱ्यांच्या कॅम्पची वीज तोडली. शेतकऱ्यांनी पोलीस आणि सरकारवर आंदोलन अस्थिर करण्याचा आरोप केला आहे.
टिकैत यांनी सांगितले की, प्रशासनाने आज वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला. लाईट बंद केली. भीतीचे वातावरण पसरविले जात आहे. यामुळे आम्ही रात्रभर जागे राहिलो आहोत. प्रशासनाला आमचे आंदोलन संपवायचे आहे. जेव्हा दिल्ली पोलीस दाखल केलेल्या गुन्ह्यांवर चौकशीला बोलवेल तेव्हा आम्ही त्यांना सामोरे जाऊ. काही शेतकरी संघटनांनी आंदोलन मागे घेतल्यावर टिकैत यांनी सांगितले की, गाझीपूर बॉर्डरवर वीज कापताच ते लोक गायब झाले.
आमचे आंदोलन सुरुच राहिल. लाल किल्ल्यावर जे काही झाले, ज्याने ते केले त्याच्याविरोधात कारवाई व्हावी. जे काही घडले आणि ज्याने घडविले त्याच्यासोबत आम्ही नाही आहोत. ट्रॅक्टर रॅलीचा जो मार्ग दिला होता, त्यावरून पोलिसांनी जाऊ दिले नाही. आम्ही काही चुकीचे केले नाही. दांड्यामध्येच झेंडा अडकवता येतो, त्यामध्ये चुकीचे काय. आंदोलन संपविण्याची सरकारची ही चाल आहे. शेतकरी नेता भीम सिंह यांनी आंदोलन सोडणे हा एक दुर्भाग्यपूर्ण निर्णय आहे.
दिल्लीमध्ये झालेल्या हिंसेनंतर शेतकरी संघटनांमध्ये फूट पहायला मिळत आहे. नोएडाच्या चिल्ला बॉर्डरवर शेतकरी संघटनेने भारतीय किसान युनियन (भानु) यांनी आंदोलन संपविण्याची घोषणा केली. मजदूर किसान युनियनने आंदोलनातून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर चिल्ला बॉर्डरवरील बॅरिकेड्स हटविण्यात आले आहेत.