'चिप'सारख्या वस्तुंमध्ये कटाची भीती! इस्त्रायलच्या पेजर स्फोटानंतर चीनबाबत सरकार अलर्टवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 12:00 PM2024-10-02T12:00:21+5:302024-10-02T12:01:03+5:30

काही दिवसापूर्वी लेबनॉनमध्ये पेजर स्फोटाची मोठी घटना समोर आली, या स्फोटात अनेकजण गंभीर जखमी झाले.

Fear of conspiracy in items like chip Government on alert regarding China after Israel's pager blast | 'चिप'सारख्या वस्तुंमध्ये कटाची भीती! इस्त्रायलच्या पेजर स्फोटानंतर चीनबाबत सरकार अलर्टवर

'चिप'सारख्या वस्तुंमध्ये कटाची भीती! इस्त्रायलच्या पेजर स्फोटानंतर चीनबाबत सरकार अलर्टवर

लेबनॉनमध्ये सक्रीय असलेल्या हिजबुल्लाहच्या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांना पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटात अनेकांचा मृ्त्यू झाला. या दोन्ही हल्ल्यांमध्ये ५० हून अधिक जमांचा मृत्यू झाला. तर सुमारे ३००० जण जखमी झाले होते. हा स्फोट सर्वच पेजरमध्ये एकाचवेळी झाला, इस्रायलच्या या नव्या युद्धनीतीने साऱ्या जगाला आश्चर्याचा धक्का बसला आहे.  सायबर आणि इलेक्ट्रॉनिक युद्धाची भीतीही वाढली आहे. भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी या हल्ल्याला इस्रायलचा मास्टर स्ट्रोक म्हटले आहे, पण याबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे त्यांनी व्यक्त केले.

Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...

दरम्यान, आता जगभरातील अनेक देश याबाबत सतर्क झाले आहेत. भारत सरकारही सतर्क आहे. चीनकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या खरेदीवर बंदी आल्याने आता स्मार्ट मीटर, पार्किंग सेन्सर, ड्रोन पार्ट्स तसेच लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या खरेदीवर नियंत्रण ठेवता येणार असल्याचे चर्चा सुरू आहे. ही उपकरणे चीनऐवजी इतर विश्वसनीय भागीदार देशांकडून घेतले जाऊ शकतात. याशिवाय भारतात त्यांच्या उत्पादनावरही भर दिला जाणार आहे. चीनमधून या उपकरणांची आयात खूप जास्त आहे. अशा स्थितीत या अवलंबित्वाचा चीन कधीही फायदा घेऊ शकतो, अशी भीती सरकारला वाटत आहे. सरकार अशा उपकरणांच्या आयातीवर नियंत्रण ठेवू इच्छिते यामध्ये चिप्स वापरल्या जातात.

इस्त्रायलने हिजबुल्लाच्या पेजरमध्ये ज्या ठिकाणी ही चिप जोडली त्याच ठिकाणी स्फोटके पेरली होती. याबाबत आता जगभरात चिंता वाढली आहे. यापूर्वीच वाणिज्य मंत्रालयाने डिसेंबरपर्यंत देखरेख ठेवण्याचे आदेश दिले होते. आता चीनमधून होणाऱ्या आयातीवर लक्ष ठेवण्यासाठी आणखी काही ऑर्डर येऊ शकतात. सरकार अशी प्रणाली आणणार आहे, या प्रणालीद्वारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू भारतात वापरण्यापूर्वी प्रमाणित केल्या जातील. यामुळे आता या वस्तु खरेदी करणाऱ्यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे. 

चीनच्या कंपन्यांचे मोबाईल भारतात जास्त येतात 

भारतीय लष्कराने यापूर्वीच याबाबत इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबाबतच्या धोक्याचा इशारा दिला आहे. नवीन प्रकारच्या युद्धांच्या काळात सरकारला कोणताही धोका पत्करायचा नाही. चीनच्या कंपन्या भारतात स्मार्टफोन विकण्यातही आघाडीवर आहेत. Xiaomi, Realme, Oppo अशा अनेक चीनी कंपन्या आहेत, या कंपन्यांचे मोबाईल भारतात मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहेत.

Web Title: Fear of conspiracy in items like chip Government on alert regarding China after Israel's pager blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.