वाढत्या कोरोना संसर्गामुळे नव्या लाटेची भीती! डॉक्टर म्हणाले, "कोरोना संपला असे समजू नये"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 07:37 PM2022-04-28T19:37:13+5:302022-04-28T19:38:09+5:30

Coronavirus Cases in India : आरोग्य तज्ज्ञांनी इशारा देत लोकांना कोरोनानुसार वागण्याचे आवाहन केले आहे. कोरोना संपला असे समजू नये, असेही त्यांनी म्हटले आहे. 

fear of new corona wave due to rising cases doctors warns people should be careful | वाढत्या कोरोना संसर्गामुळे नव्या लाटेची भीती! डॉक्टर म्हणाले, "कोरोना संपला असे समजू नये"

वाढत्या कोरोना संसर्गामुळे नव्या लाटेची भीती! डॉक्टर म्हणाले, "कोरोना संपला असे समजू नये"

googlenewsNext

नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा (Coronavirus Cases in India) वेग पुन्हा वाढला आहे. गुरुवारी देशभरात कोरोनाचे 3 हजार रुग्ण आढळले. दरम्यान, आरोग्य तज्ज्ञांनी इशारा देत लोकांना कोरोनानुसार वागण्याचे आवाहन केले आहे. कोरोना संपला असे समजू नये, असेही त्यांनी म्हटले आहे. 

बंगळुरूमधील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ जेनेटिक्स अँड सोसायटीचे डॉ. राकेश मिश्रा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेसोबत बातचीत केली. यावेळी कोरोना विषाणूशी संबंधित धोका अद्याप कमी झालेला नाही आणि लोकांनी या विषाणूपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली पाहिजे. या विषाणूचा प्रभाव टाळण्यासाठी पुरेशी खबरदारी आणि पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहे, असे डॉ. राकेश मिश्रा म्हणाले. तसेच, ते म्हणाले की, असे दिसून आले आहे की कोणत्याही क्षेत्रात प्रकरणे वाढत असतील तर तेथे नवीन प्रकार उपस्थित होण्याची शक्यता आहे. जरी आपण हे निश्चितपणे सांगू शकत नाही.

डॉ. राकेश मिश्रा यांनी सांगितले की, कोरोना टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मास्क, सोशल डिस्टन्सिंगसह इतर खबरदारी घेणे. या सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष केल्यास, तुम्ही पुन्हा या विषाणूला बळी पडण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळेही त्रास होऊ शकतो. मात्र, भारतात अद्ययावत आलेल्या कोरोनाच्या प्रकरणांमुळे घाबरून जाण्याची गरज नाही. परंतु नंतर आपल्याला पाळत ठेवण्याची यंत्रणा मजबूत करावी लागेल, ज्यामध्ये कोरोना चाचणी आणि जीनोम अनुक्रम पद्धतीचा समावेश आहे.

याचबरोबर, डॉ विकास मिश्रा म्हणाले की, आजच्या तारखेला समोर आलेली कोरोनाची प्रकरणे जुन्या आकडेवारीच्या तुलनेत खूपच कमी आहेत, परंतु याचा अर्थ आपण काळजी करू नये असा नाही. कारण कोरोना विषाणू कुठेही गेला नसून तो आपल्या अवतीभवती आहे. या विषाणूचे आणखी बरेच नवीन म्यूटेशन देखील बाहेर येऊ शकतात. त्यामुळे पुढचे काही महिने आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे.

Web Title: fear of new corona wave due to rising cases doctors warns people should be careful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.