Ajay Pandita Murder : भ्याड दहशतवाद्यांनो! हिम्मत असेल समोर या, मी तुम्हाला सोडणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 12:59 PM2020-06-11T12:59:14+5:302020-06-11T13:01:08+5:30
डोळ्यात अश्रू आणि अंत: करणात वेदना असलेली मुलगी आपल्या वडिलांच्या खुनी असलेल्या दहशतवाद्यांना देत आहे खुले आव्हान
श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील लारकीपोराचे सरपंच अजय पंडिता यांची अतिरेक्यांनी सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्याच गावात गोळ्या घालून हत्या केली. अजय पंडिता हे काँग्रेस पक्षाचे सदस्यही होते. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. काँग्रेसच्या प्रवक्त्याने या हत्येचा निषेध केला व पंडित हे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते, असे म्हटले. या हत्येची अजून कोणत्याही अतिरेकी संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही. मात्र, अजय पंडिता यांच्या मुलीने दहशतवाद्यांना समोर येण्यासाठी खुले आव्हान दिले आहे.
डोळ्यात अश्रू आणि अंत: करणात वेदना असलेली मुलगी आपल्या वडिलांच्या खुनी असलेल्या दहशतवाद्यांना आव्हान देताना म्हणते '.. भ्याड, हिम्मत असेल तर बाहेर ये. मी तुला सोडणार नाही मी तुला मारू टाकेन. किती काळ तुम्ही मूर्खांसारखे हत्या करत बसणार आहात. या धाडसी मुलीचे नाव शीन पंडिता आहे, तिचे वडील सरपंच अजय पंडिता (भारती) यांना दोन दिवसांपूर्वी दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग येथे दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार मारले होते. काश्मिरी भाषेत शीनला बर्फ म्हणतात, परंतु वडिलांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी शीन एक ज्योत बनली आहे. शीन म्हणाल्या की, वडिलांनी आपले कर्तव्य बजावले होते, आता सरकारने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.
काश्मिरात ९ अतिरेक्यांचा खात्मा, वर्षभरात ८८ अतिरेक्यांना कंठस्नान
खोट्या प्रेमाचं कडवट सत्य, तरुणीच्या शरीराचे तुकडे तुकडे करून केली हत्या
बुधवारी जम्मूमध्ये माध्यमांशी बोलताना शीन पंडिता म्हणाली की, मी अजय भारतींची मुलगी असल्याचा मला अभिमान आहे. वडील मला सांगायचे की, तू माझा सिंह आहेस. मी माझ्या वडिलांना आश्वासन देतो की, त्याचा सिंह त्यांचा मारेकऱ्यांना सोडणार नाही. भ्याड दहशतवाद्यांनी सिंहाची हत्या केली आहे. आता मी त्यांचा वध करेन. मी कधीही घाबरणार नाही आणि मी कधीही डगमगून हार मानणार नाही. अश्रू पुसताना शीन म्हणाली की, वडिलांना गमावल्याचे दु: ख माझ्या कुटुंबाला माहित आहे. माझी आई, काकू, आजी यांना धक्का बसला आहे.
संशयास्पद! माजी रणजी क्रिकेटपटू जायमोहन थंपी यांचा राहत्या घरात आढळला मृतदेह