आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच, जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज काश्मीरमध्ये बांधून तयार, अशी आहेत वैशिष्ट्ये
By बाळकृष्ण परब | Published: February 25, 2021 03:56 PM2021-02-25T15:56:18+5:302021-02-25T16:00:29+5:30
The world's tallest railway bridge was built in Kashmir : आयफेल टॉवरपेक्षाा ३५ मीटर उंच आणि जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज जम्मू काश्मीरमध्ये बांधून तयार झाला आहे. या ब्रिजचे बांधकाम गेल्या तीन वर्षांपासून सुरू होते.
नवी दिल्ली - आयफेल टॉवरपेक्षाा ३५ मीटर उंच आणि जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज जम्मू काश्मीरमध्ये बांधून तयार झाला आहे. या ब्रिजचे बांधकाम गेल्या तीन वर्षांपासून सुरू होते. आता हा ब्रिज जवळपास बांधून तयार झाला आहे. आता रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या ब्रिजचे फोटे शेअर करून ही खूशखबर दिली आहे.
जम्मू काश्मीरमध्ये चिनाब नदीवर हा ब्रिज उभारण्यात आला आहे. या ब्रिजच्या वैशिष्ट्यांबाबत माहिती देताना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी हा ब्रिज हा बांधकामाचा उत्तम नमुना आहे. भारतीय रेल्वे स्थापत्यक्षेत्रातील अजून एक मैलाचा दगड पार करण्याच्या मार्गावर आहे. हा ब्रिज जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज असेल, असे पीयूष गोयल यांनी सांगितले.
Infrastructural Marvel in Making: Indian Railways is well on track to achieve another engineering milestone with the steel arch of Chenab bridge reaching at closure position.
— Piyush Goyal (@PiyushGoyal) February 25, 2021
It is all set to be the world's highest Railway bridge 🌉 pic.twitter.com/yWS2v6exiP
इंद्रधनुष्याच्या आकाराच्या या ब्रिजचे बांधकाम २०१७ मध्ये सुरू झाले होते. हा ब्रिज भारतीय रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग आहे ज्या माध्यमातून जम्मू-काश्मीरला भारताच्या अन्य भागाशी जोडण्यात येणार आहे. चिनाब नदीवर १२५० कोटी रुपये खर्चून हा ब्रिज बांधण्यात आला आहे. चिनाब नदीच्या तळापासून या ब्रिजची उंची ही ३५९ मीटर आहे. हा ब्रिज पॅरिसमधील प्रसिद्ध आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटरने उंच आहे.
या ब्रिजचं खास वैशिष्ट्य म्हणजे या रेल्वे ब्रिजवर रिश्टर स्केलवरील ८ तीव्रतेच्या भूकंपाचा तसेच अतीतीव्रतेच्या स्फोटाचा काहीही परिणाम होणार नाही. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार संभाव्य दहशतवादी हल्ले आणि भूकंप यांच्यापासून बचावासाठी ब्रिजमध्ये विशेष सुरक्षा प्रणाली असेल. ब्रिजची एकूण लांबी ही १३१५ मीटर असेल.