फूड समजून शेणाच्या गवऱ्याच मागवल्या, टेस्ट करुन लिहिलेला अभिप्राय व्हायरल
By महेश गलांडे | Published: January 21, 2021 12:07 PM2021-01-21T12:07:52+5:302021-01-21T12:09:53+5:30
सोशल मीडियावर या व्यक्तीने खाल्लेल्या गवऱ्याची आणि त्याने लिहिलेल्या अभिप्रायाचीच चर्चा व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने अमेझॉन या साईटवरुन शेणाच्या गवऱ्या मागवल्या होत्या.
मुंबई - कोरोनामुळे ऑनलाईन शॉपिंगचं मार्केट चांगलंच वाढल असून लोकांचा कलही ऑनलाईन खरेदीकडे वाढला आहे. या ऑनलाईन शॉपिंग साईटमध्ये फ्लिपकार्ट, अमेझॉन यांना प्राधान्य देत खरेदी करण्यात येते. विशेष म्हणजे या कंपन्यांकडूनही ग्राहकांना चांगली आणि तत्पर सेवा देण्यासाठी नेहमीच प्रयत्न होतो. त्यामुळेच, सर्वकाही ग्राहकांना एका क्लिकवर उपलब्ध होते. एका व्यक्तीने धार्मिक कार्यक्रमासाठी वापरण्यात येणाऱ्या शेणाच्या गवऱ्यांची ऑनलाईन ऑर्डर केली होती. मात्र, या गवऱ्यांचा वापर धार्मिक कार्यक्रमात न करता खाण्यासाठी केला.
सोशल मीडियावर या व्यक्तीने खाल्लेल्या गवऱ्याची आणि त्याने लिहिलेल्या अभिप्रायाचीच चर्चा व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने अमेझॉन या साईटवरुन शेणाच्या गवऱ्या मागवल्या होत्या. विशेष म्हणजे त्या गवऱ्यांचा वापर धार्मिक कार्यक्रम किंवा जाळण्यासाठी न करता खाण्यासाठी केला. त्यानंतर, या गवऱ्याच्या चवीबद्दल आपला अभिप्रायही साईटवर जाऊन रिव्हीवमध्ये लिहिला आहे. अतिशय खराब अशी चव असल्याचं त्यानं म्हटलंय. डॉ. संजय अरोरा या ट्विटर युजर्संने याचा स्क्रीनशॉट आपल्या अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
Ye mera India, I love my India…. :) pic.twitter.com/dEDeo2fx99
— Dr. Sanjay Arora PhD (@chiefsanjay) January 20, 2021
डॉ. संजय अरोरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरु त्या व्यक्तीने दिलेल्या अभिप्राय शेअर करत, ये मेरा इंडिया, आय लव्ह माय इंडिया असे कॅप्शन दिलंय. आपल्या अभिप्रायमध्ये संबंधित व्यक्तीने, मी जेव्हा ते खाल्लं अतिशय बेकार वाटलं, ते गवतासारखं आणि चवीला चिखलासारखं होतं. त्यामुळे, मला जुलाबाा त्रास सुरु झाला आहे. कृपया, यापुढे निर्माण करताना काळजी घ्या. तसेच, या उत्पादनाच्या चव आणि सुगंधावरही लक्ष द्यायला हवं., असं लिहलंय.
अमेझॉनवर या उत्पादनाचं वर्ण करताना, हे धार्मिक विधी आणि कार्यक्रमासाठी वापरावे, गाईच्या शेणापासून बनविलेले 100 टक्के शुद्ध अशा या गवऱ्या आहेत. वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी आणि किड्यांना हटविण्यासाठी याचा वापर केला जातो, असे लिहिले आहे.