सरसंघचालक घेणार व्यापमंचा फीडबॅक
By admin | Published: July 10, 2015 11:13 PM2015-07-10T23:13:43+5:302015-07-10T23:13:43+5:30
रविवारी समिधात बैठक: चिंता वाढली
Next
र िवारी समिधात बैठक: चिंता वाढलीशिवअनुराग पटैरया/राजेंद्र पाराशरभोपाळ: सरसंघचालक मोहन भागवत दोन दिवसांच्या दौऱ्यावर शनिवारी येथे येणार असून व्यावसायिक परीक्षा मंडळ घोटाळ्यासंदर्भात (व्यापमं)ते सविस्तर माहिती घेतील. विशेषत: मध्य प्रदेशात भाजपाची स्थिती आणि या घोटाळ्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालावर ते संघ पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत.व्यापमं घोटाळ्यामुळे केवळ मध्य प्रदेशातच नाहीतर संपूर्ण देशात निर्माण झालेल्या प्रतिकूल वातावरणामुळे संघाची चिंता वाढली असून यातून लवकरात लवकर मुक्ती मिळविण्याची संघटनेची इच्छा आहे. भाजपाच्या प्रतिमेवर याचा काय आणि किती परिणाम झाला हे जाणून घेण्यासाठी पक्षाने राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरही विचारमंथन सुरू केले आहे. अलीकडेच संघातर्फे राज्यात दोन प्रकारचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यापैकी एक सत्ता व संघटनेची जनतेच्या मनात असलेली प्रतिमा आणि दुसरा व्यापमं घोटाळा आणि त्याच्याशी संबंधित मृत्यूबाबत होता. हे सर्वेक्षण अद्याप पूर्ण झाले नसल्याचे सांगितले जाते. सरसंघचालक शनिवार आणि रविवार असे दोन्ही दिवस भोपाळमध्येच मुक्कामी असून या दोन मुद्यांवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशिवाय मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याशीही ते चर्चा करतील. भागवत आणि संघ पदाधिकाऱ्यांसोबत रविवारी समिधामध्ये चौहान, प्रदेश भाजपाचे अध्यक्ष नंदकुमार सिंग चौहान आणि प्रदेश संघटन मंत्री अरविंद मेनन यांची समन्वय बैठक होणार आहे. या बैठकीत सरसंघचालक प्रामुख्याने व्यापमं घोटाळ्याच्या परिणामांचा आढावा घेणार असून त्यानंतरच ते कुठल्या निर्णयाप्रत पोहोचतील यामुळे ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या बैठकीतच सत्ता आणि संघटनेतील नेत्यांचे भविष्य ठरेल.प्रकाश झा व्यापमंवर चित्रपट काढणार?सामाजिक मुद्यांवर चित्रपट निर्मिती करणारे प्रकाश झा यांनी व्यापमं घोटाळ्यावर चित्रपट काढण्याचे संकेत दिले आहेत. तत्पूर्वी हा संपूर्ण विषय जाणून घेण्याची त्यांची इच्छा आहे. हा विषय तरुण पिढीशी संबंधित आणि मध्य प्रदेशशिवाय संपूर्ण देशात चर्चेत असल्याने झा यांना तो महत्त्वाचा वाटतो. झा सध्या भोपाळ आणि आजूबाजूच्या परिसरात गंगाजल-२ या चित्रपटाचे चित्रिकरण करीत आहे. ते म्हणाले, एखाद्या विषयावर चित्रपट निर्मितीपूर्वी मी चार ते पाच वर्षे त्यावर सखोल विचार करतो. त्यानंतर चित्रपटाचे काम सुरू होते. व्यापमं घोटाळा समाजाशी निगडित असून त्याची सीबीआय चौकशीही होणार आहे. अनेक व्यावसायिक, राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांसह सर्व वर्गाचे लोक यात सामील असल्याने चित्रपट निर्मितीचा विचार होऊ शकतो.