राष्ट्रभाषा परीक्षेत निखत परवीन विदर्भात प्रथम भारिप-बमसं युवक आघाडीतर्फे सत्कार
By admin | Published: December 20, 2014 10:28 PM2014-12-20T22:28:15+5:302014-12-20T22:28:15+5:30
अकोला : आंबेडकरी कलावंत लुकमान ताज यांची कन्या निखत परवीन शाह हिने राष्ट्रभाषा प्राथमिक परीक्षेत विदर्भातून क्रमांक प्राप्त केला. त्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कक्षात भारिप-बहुजन महासंघ युवक आघाडीच्यावतीने तिचा सत्कार करण्यात आला.
Next
अ ोला : आंबेडकरी कलावंत लुकमान ताज यांची कन्या निखत परवीन शाह हिने राष्ट्रभाषा प्राथमिक परीक्षेत विदर्भातून क्रमांक प्राप्त केला. त्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कक्षात भारिप-बहुजन महासंघ युवक आघाडीच्यावतीने तिचा सत्कार करण्यात आला.जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई यांच्या हस्ते निखत परवीन हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने भारिप-बमसं युवक आघाडीचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र पातोडे उपस्थित होते. निखतच्या यशात तिच्या परिश्रमाचा मोठा वाटा असून, तिचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे गौरवोद्गार जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई यांनी याप्रसंगी काढले. कार्यक्रमाचे संचालन युवक आघाडीचे जिल्हा महासचिव सचिन शिराळे यांनी तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष नितेश किर्तक यांनी केले. यावेळी देवानंद अंभासरे, विरेन पवार, चरणसिंग चव्हाण, हिरासिंग राठोड, आनंद खंडारे, अमोल सिरसाट, सुरेंद्र तेलगोटे, भारत निकोसे, ज्ञानेश्वर इंदूरकर, संतोष गवई, निर्भय पोहरे, पद्मानंद वानखडे, बुध्दरत्न इंगोले, जीवन डिगे, निखिल खानझोडे, राजेश तायडे, देवानंद खडे, नितीन प्रधान, धर्मेंद्र दंदी, सचिन हिरोळे, सागर गवई आदी उपस्थित होते.........फोटो........21 सीटीसीएल...68..................