छात्र संसदेत विराज कावडीया यांचा सत्कार
By admin | Published: January 26, 2017 02:07 AM2017-01-26T02:07:14+5:302017-01-26T02:07:14+5:30
जळगाव : पुणे येथे सातवी भारतीय छात्रसंसद नुकतीच पार पडली़ यात जळगाव येथील ३६७ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला़ छात्र संसद विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे समन्वयक विराज कावडीया यांचा सामाजिक कार्याबद्दल भारतीय छात्र संसदचे संयोजक राहूल कराड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़
Next
ज गाव : पुणे येथे सातवी भारतीय छात्रसंसद नुकतीच पार पडली़ यात जळगाव येथील ३६७ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला़ छात्र संसद विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे समन्वयक विराज कावडीया यांचा सामाजिक कार्याबद्दल भारतीय छात्र संसदचे संयोजक राहूल कराड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़छात्र संसदेत एकूण सहा विषयांवर चर्चा झाली व ठराव मंजूर करण्यात आले़ देशातील आठ हजार तसेच नेदरलँड देशातील ॲम्स्ट्राडॅम विद्यापीठाचे १०० विद्यार्थी, नेपाल येथील १३७ विद्यार्थी छात्र संसदेत सहभागी झाले़ केंद्रीय मंत्री विजय गोयल, बाबा रामदेव, अर्नब गोस्वामी, रिकी केज, ज्येष्ठ पत्रकार वैदीक प्रकाश वेद्य, अभय फिरोदीया, त्रिपुरा चे मुख्यमंत्री माणिक सरकार, तुषार गांधी, तसेच जम्मू काश्मिर, कर्नाटक, ओडीसा, गुजरात, उत्तराखंड या राज्यातील विधान सभेचे अध्यक्ष उपस्थित होते़ भारतीय छात्र संसद विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे समन्वयक विराज कावडीया यांना विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मंचावर आपले मत मांडण्याची संधी मिळाली़ कार्यक्रमाला भारत सरकार व महाराष्ट्र शासन तसेच युनेस्कोचे सहकार्य प्राप्त होत असते़कैकाडी महासंघ जिल्हाध्यक्षपदी डॉ़हितेंद्र गायकवाडजळगाव : आखिल भारतीय कैकाडी महासंघाचे राज्याध्यक्ष संजय मेढे यांच्या उपस्थितीत नुकतीच कार्यकारी जाहीर झाली़ यात जिल्हाध्यक्षपदी डॉ़हितेंद्र युवराज गायकवाड यांची निवड करण्यात आली़ जिल्हा कार्याध्यक्ष विनोद जाधव, जिल्हा उपाध्यक्ष डिगंबर जाधव, जिल्हा सचिव शोभा जाधव, जिल्हा सहसचिव त्र्यंबक गायकवाड यांचा नुतन कार्यकारिणीत समावेश आहे़ जिल्हाध्यक्ष जाधव महासंघाचे कामासाठी जळगाव, एरंडोल, धरणगाव, भुसावळ, यावल, रावेर, बोदवड, चोपडा, मुक्ताईनगर, चाळीसगाव, जामनेर, भडगाव, अमळनेर, पाचोरा येथे तालुकाध्यक्षांची नेमणूक केली़