रस्त्यावरच झाली महिलेची प्रसूती

By admin | Published: March 13, 2017 02:04 PM2017-03-13T14:04:04+5:302017-03-13T14:04:04+5:30

एक भिकारीन त्या महिलेच्या मदतीसाठी पुढे आली आणि तिनेच त्या महिलेची प्रसूती केली

Female delivery on the street | रस्त्यावरच झाली महिलेची प्रसूती

रस्त्यावरच झाली महिलेची प्रसूती

Next

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 13 - भारतीय समाजात मानवतेची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. बंगळुरूत रस्त्याच्या मधोमध माणुसकीचं दर्शन घडलं आहे. रस्त्यावरच एका महिलेला प्रसूती कळा येण्यास सुरुवात झाली. आजूबाजूला मदतीसाठी कोणीही उपस्थित नसल्याचं पाहता क्षणी एक भिकारीन त्या महिलेच्या मदतीसाठी पुढे आली आणि तिनेच त्या महिलेची प्रसूती केली. त्यामुळे सर्वांचेच डोळे भरून आले.

30 वर्षीय येलम्माची मुलगी होण्याची इच्छा पूर्ण झाली. मात्र ती फक्त एका जंक्शनच्या रोडवर. त्यानंतर एका स्थानिक आमदारानंही प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या शहरात ही सुंदर घटना घडली आहे. आई आणि मुलगी सुखरूप आहे, अशी माहिती स्थानिक आमदार बल्लाटगी यांनी दिली आहे.

सन्ना बाजार येथे वास्तव्याला असलेल्या रमन्ना आणि त्यांची पत्नी येलम्मा यांना तीन मुलगे आहेत. मात्र त्यांना ब-याच काळापासून एका मुलीची प्रतीक्षा होती. गर्भारपणाचे 36 आठवडे पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना रायचूर येथे जाण्याचा सल्ला दिला. दोघेही रायचूर येथे जात असताना येलम्मा यांना जोरजोरात प्रसूती कळा येऊ लागल्या आणि त्या गाडीतून उतरल्या. रस्त्यावर पडून जोरजोरात ओरडू लागल्या. पतीही पत्नीला अशा अवस्थेत पाहून घाबरला. मात्र शेजारील एका भिकारनीनं त्या महिलेला बाळाला जन्म देण्यासाठी मदत केली. त्यानंतर जवळपासच्या सर्वच महिला गोळा झाल्या. महिलेनं सृदृढ बाळाला जन्म दिला. येलम्मा यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र येलम्माची प्रसूती करणारी भिकारी महिला तिथून अचानक गायब झाली. या घटनेनं सगळीकडे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Female delivery on the street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.