तरुणावर प्राणघातक हल्ला
By admin | Published: October 3, 2015 12:20 AM2015-10-03T00:20:37+5:302015-10-03T00:20:37+5:30
तरुणावर प्राणघातक हल्ला
Next
त ुणावर प्राणघातक हल्लाकळमेश्वर : पैशाच्या व्यवहारातून दोघांनी तरुणावर चाकूने हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास कळमेश्वर शहरात घडली. संदीप काशिनाथ तलवे (३५, रा. कळमेश्वर) असे जखमी तरुणाचे नाव असून, मुन्ना ऊर्फ राहुल गिरधर चिमूरकर (२२, रा. कळमेश्वर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. संदीप व मुन्ना यांच्यात पैशाच्या व्यवहारातून वाद उद्भवला होता. दरम्यान, शनिवारी रात्री मुन्ना हा दाजिबा बारसमोर उभा होता. संदीप हा बारच्या बाहेर पडताच मुन्ना व त्याच्या मित्राने संदीपसोबत वाद घालायला सुरुवात केली. हा वाद विकोपास गेल्याने दोघांनी त्याच्या पोट व पाठीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी भादंवि ३०४ अन्वये गुन्हा नोंदवून मुन्नाला अटक केली. दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)***चोरट्यास अटकनागपूर : बुटीबोरी येथील टीचर कॉलनीत चोरी करणाऱ्या चोरट्यास बुटीबोरी पोलिसांनी अटक केली. चोरीची ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली होती.प्रकाश बाबाराव रोकडे (२५, रा. मौदा, ता. पांढरकवडा, जिल्हा यवतमाळ) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. फिर्यादी सचिन धनराज डाखोळे (२६, रा. टिचर कॉलनी, बुटीबोरी) हे बाहेरगावी गेले होते. दरम्यान, घरी कुणीही नसल्याचे पाहून प्रकाशने दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि १ लाख ४४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी भादंवि ३८० अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली. (प्रतिनिधी)***विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यूखापरखेडा : शेतातील मोटरपंप सुरू करताना विजेचा धक्का लागला आणि त्यातच शेतकऱ्या मृत्यू झाला. ही घटना खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बैलवाडा शिवारात गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.सुरेश लक्ष्मण जुमडे (४२, रा. बैलवाडा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सुरेश जुमडे हे शेतात काम करीत होते. दरम्यान, सायंकाळी त्यांनी मोटारपंप सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्यातच त्यांना विजेचा जोरदार धक्का लागला आणि घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोेंद करून तपास सुरू केेला आहे. (प्रतिनिधी)***