केमिकल कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 12:27 PM2021-05-12T12:27:48+5:302021-05-12T12:30:13+5:30
बुलंदशहर रोडस्थित कवी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एफ-23 मिथाईल पिगमेंट कंपनीत ही आगीची दुर्घटना घडली. त्यानंतर, या आगीने रौद्र रुप धारण केले असून शेजारील दोन कंपन्यांनाही या आगीची झळ सोसावी लागली आहे.
गाझीयाबाद - उत्तर प्रदेशातील गाझीयाबाद येथील एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. बुलंदशहर रोडवरील इंडस्ट्रीयल एरियातील एका केमीकल कंपनीत ही आग लागली. त्यानंतर, शेजारील इतरही कंपन्या आगीच्या भक्ष्यस्थानी आल्या आहेत. सुरुवातीला आग लागताच केमिकलचे ड्रम फुटल्याने आगीने रौद्र रुप धारण केले. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तेथे धाव घेतली असून आग आटोक्यात आणण्यात येत आहे.
बुलंदशहर रोडस्थित कवी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एफ-23 मिथाईल पिगमेंट कंपनीत ही आगीची दुर्घटना घडली. त्यानंतर, या आगीने रौद्र रुप धारण केले असून शेजारील दोन कंपन्यांनाही या आगीची झळ सोसावी लागली आहे. आग लागलेली कंपनी केमिकल उत्पादनाशी निगडीत असल्याने आगीचे स्फोट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे, दूरपर्यंत आगीच्या धुराचे लोट पाहायला मिळाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
Ghaziabad: A massive fire broke out at a cartons manufacturing factory and spread to nearby factories in Kavi Nagar Industrial Area. More than 10 fire tenders present at the spot. Fire fighting operations are underway. Details awaited. pic.twitter.com/aaMbtJCIrG
— ANI UP (@ANINewsUP) May 12, 2021
एनडीआरएफ टीमनेही घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले आहे. शहर मुख्याधिकारी व दंडाधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेची चौकशी सुरू आहे, मात्र आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. दरम्यान केमिकल कंपनीतून आग पाईपच्या आणि पुठ्ठ्याच्या कंपनीत पसरत गेल्याचे सांगण्यात येत आहे.