LOCनजिकच्या जंगलामध्ये भीषण आग, अनेक भूसुरुंगांचा झाला स्फोट  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 11:14 PM2022-05-18T23:14:07+5:302022-05-18T23:14:40+5:30

Fire near LOC: जम्मू काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ लागेली आग वेगाने पसरत मेंढर सेक्टरमधील भारतीय सीमेपर्यंत पोहोचली. या आगीमुळे जमिनीत पेरून ठेवलेल्या अनेक भूसुरुंगांचा स्फोट झाला. अधिकाऱ्यांनी आज ही माहिती दिली.

Fierce forest fire near LOC, several landmines explode | LOCनजिकच्या जंगलामध्ये भीषण आग, अनेक भूसुरुंगांचा झाला स्फोट  

LOCनजिकच्या जंगलामध्ये भीषण आग, अनेक भूसुरुंगांचा झाला स्फोट  

Next

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ लागेली आग वेगाने पसरत मेंढर सेक्टरमधील भारतीय सीमेपर्यंत पोहोचली. या आगीमुळे जमिनीत पेरून ठेवलेल्या अनेक भूसुरुंगांचा स्फोट झाला. अधिकाऱ्यांनी आज ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सोमवारी एलओसी पलिकडे एका जंगलात मोठी आगल लागल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर ही आग वाढत पुढेपर्यंत पोहोचली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आगीने सुमारे अर्धा डझन भूसुरुंगांचा स्फोट घडवून आणला. हे सुरुंग नियंत्रण रेषेवरून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी पेरण्यात आलेले होते.

त्यांनी सांगितले की, जंगलामध्ये गेल्या तीन दिवसांपासून आग लागलेली आहे. आम्ही लष्करासोबत मिळून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. दरम्यान, फॉरेस्टर कनार हुसेन शाह यांनी सांगितले की, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते. मात्र बुधवारी सकाळी ही आग दरमशाल ब्लॉकमध्ये सुरू झाली आणि वेगवान वाऱ्यांमुळे वेगाने पसरली. त्यांनी सांगितले की, नंतर लष्कराची मदत घेण्यात आली आणि त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. 

अधिकाऱ्यांनी याबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की, राजौरी जिल्ह्यामध्ये सीमेजवळ सुंदरबनी क्षेत्रामध्ये भीषण आग लागली. ती गंभीर, निक्का, पंजग्रेय, ब्राह्मण, मोगला यांसह इतर वनक्षेत्रात पसरली. कालाकोटच्या कलार, रणथल, चिंगी या जंगलांमध्येही आग लागली. आग सीमेपार लागली आणि कांगडी डॉक बन्यादच्या एलओसी परिसरात पसरली. त्यांनी सांगितले की, जंगलातील आगीवर कुठल्याही मानवीय हानीशिवाय नियंत्रण मिळवण्यात आले.  

Web Title: Fierce forest fire near LOC, several landmines explode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.