FIFA World Cup Final 2022: 'हा सर्वात थरारक फुटबॉल सामना म्हणून...'; नरेंद्र मोदींनीही अंतिम सामन्याचा लुटला आनंद
By मुकेश चव्हाण | Published: December 19, 2022 12:24 AM2022-12-19T00:24:05+5:302022-12-19T00:24:37+5:30
FIFA World Cup Final 2022: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिफा विश्वचषक जिंकलेल्या अर्जेंटिना संघाचे अभिनंदन केले आहे.
लिओनेल मेस्सीचा अखेरच्या विश्वचषक स्पर्धेत जेतेपद पटकावण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्जेंटिनाच्या प्रत्येक खेळाडूने कोणतीच कसर सोडली नाही. फ्रान्सकडून तोडीसतोड खेळ झाला अन् कायलिन एमबाप्पे एकटा भिडला. १२० मिनिटांच्या सामन्यात ३-३ अशी बरोबरी झाली अन् पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने बाजी मारली आणि फिफा विश्वचषक २०२२ वर आपलं नाव कोरलं.
पराभूत फ्रान्सचे जिंकले २४८ कोटी रुपये, जग्गजेत्या अर्जेंटिनाचा थक्क करणारा आकडा...!
अर्जेंटिना आणि फ्रान्समध्ये रंगलेल्या अंतिम सामन्यात थरारक अनुभव पाहायला मिळाला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या सामन्याचा आनंद लुटला. तसेच विजयी झालेल्या अर्जेंटिना संघाचे अभिनंदन देखील नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे केले आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले की, हा सर्वात थरारक फुटबॉल सामना म्हणून लक्षात राहील...फिफा विश्वचषक २०२२चे चॅम्पियन झाल्याबद्दल अर्जेंटिना संघाचे अभिनंदन...त्यांनी या स्पर्धेत शानदार खेळ केला आहे. अर्जेंटिना आणि मेस्सीच्या लाखो भारतीय चाहत्यांना खूप आनंद झाल्याचंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
This will be remembered as one of the most thrilling Football matches! Congrats to Argentina on becoming #FIFAWorldCup Champions! They’ve played brilliantly through the tournament. Millions of Indian fans of Argentina and Messi rejoice in the magnificent victory! @alferdez
— Narendra Modi (@narendramodi) December 18, 2022
फुटबॉलमध्ये अखेरच्या सेंकदातही काही होऊ शकते याची प्रचिती वर्ल्ड कप फायनलमध्ये आली. 80व्या मिनिटापर्यंत 2-0 अशा आघाडीवर असलेल्या अर्जेंटिनाला 1 मिनिट व 37 सेकंदात दोन धक्के बसले. कायलिन एमबाप्पेच्या दोन गोलने फ्रान्सच्या पाठीराख्यांमध्ये प्राण फुंकले.
लिओनेल मेस्सीची स्वप्नपूर्ती! अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सला नमवले
8 मिनिटांच्या भरपाई वेळेत दोन्ही संघांच्या गोलरक्षकाने एकेक गोल रोखला अन् सामना अतिरिक्त 30 मिनिटांत गेला. पहिली 15 मिनिटे तोडीसतोड खेळ झाल्यानंतर लिओनेल मेस्सीची जादू पुन्हा चालली अन् त्याने 108व्या मिनिटाला गोल करून अर्जेंटिनाला वर्ल्ड कप जिंकून दिला असे वाटत असताना एमबाप्पेने गोल करून सामना 120 मिनिटांच्या खेळात 3-3 असा बरोबरीत सोडवला.
🏆 𝐂𝐇𝐀𝐌𝐏𝐈𝐎𝐍𝐒 🏆 pic.twitter.com/L2QO9h85hf
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 18, 2022
पेनल्टीचा थरार...
कायलिन एमबाप्पे - 1-0 ( फ्रान्स )
लिओनेल मेस्सी - 1-1 ( अर्जेंटीना)
किंग्स्ली कोमन ( संधी गमावली ) - 1-1 ( फ्रान्स)
पॉलो डिबाला - 1-1 ( अर्जेंटिना)
आरेलोना टी चौमेनी ( संधी गमावली ) - 1-2 ( फ्रान्स)
लिएंड्रो पेरेडेस - 3-1 ( अर्जेंटीना)
रँडल कोलो मौनी - 2-3 ( फ्रान्स)
गोंझालो मॉटेई - 4-2 ( अर्जेंटीना)
अर्जेंटिना संघाला 347 कोटी रुपये बक्षिस-
फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात विजेता झालेल्या अर्जेंटिना संघाला 347 कोटी रुपये बक्षिस म्हणून देण्यात आले आहे. तर उपविजेत्या फ्रान्सच्या संघला 248 कोटी रुपये देण्यात आले आहे. तिसरं स्थान पटकावलेल्या क्रोएशियाला 223 कोटी रुपये आणि चौथ्या स्थानावर असलेल्या मोरक्को 206 कोटी रुपये बक्षिस म्हणून देण्यात आले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"