पंधरा मिनिटात पावणे सहा लाखाची हातसफाई
By Admin | Published: July 20, 2016 11:49 PM2016-07-20T23:49:10+5:302016-07-20T23:49:10+5:30
जळगाव: शहरात घरफोडीचे सत्र सुरुच असून मंगळवारी तीन ठिकाणी घरफोडी झाल्याचे उघड झाल्यानंतर सिंधी कॉलनीला लागून असलेल्या संत कंवरराम नगरातही वासुमल संत कंवरराम टॉवरमध्ये वासुमल तेजुमल दासवाणी (वय ४०) या व्यापार्याकडे धाडसी घरफोडी झाली आहे. कडीकोयंडा तोडून अवघ्या पंधरा मिनिटात चोरट्यांनी दोन लाखाची रोकड व पावणे तीन लाखाचे दागिने लंपास केले आहेत. विशेष म्हणजे ही घरफोडीदेखील मंगळवारीच झाला आहे. बुधवारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
ज गाव: शहरात घरफोडीचे सत्र सुरुच असून मंगळवारी तीन ठिकाणी घरफोडी झाल्याचे उघड झाल्यानंतर सिंधी कॉलनीला लागून असलेल्या संत कंवरराम नगरातही वासुमल संत कंवरराम टॉवरमध्ये वासुमल तेजुमल दासवाणी (वय ४०) या व्यापार्याकडे धाडसी घरफोडी झाली आहे. कडीकोयंडा तोडून अवघ्या पंधरा मिनिटात चोरट्यांनी दोन लाखाची रोकड व पावणे तीन लाखाचे दागिने लंपास केले आहेत. विशेष म्हणजे ही घरफोडीदेखील मंगळवारीच झाला आहे. बुधवारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.वासुमल दासवाणी यांचे गोलाणी मार्केटमध्ये नीरज ऑटो म्हणून स्पेअर पार्टचे दुकान आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजता ते घरुन दुकानात आले होते तर पत्नी अरुणा या संध्याकाळी सिंधी कॉलनीतील मंदिरात गेल्या होत्या. तिघं मुले सव्वा पाच वाजता क्लासला गेले होते. तेथून सहा वाजता मुले घरी आले असता पायल नावाच्या मुलीला घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला दिसला तर घरात कपाट उघडे दिसले.ती घाबरतच बाहेर आली. शेजारीच्या महिलेला झाल्याप्रकाराची माहिती दिली. त्यांनी अरुणा व वासुमल यांना फोन करुन घरात काही तरी प्रकार झाल्याचे कळवले.अन् पती-पत्नी धावत आलेघरात नेमके काय झाले असावे म्हणून अरुणा व वासुमल दासवाणी धावपळ करत घरी आले. घराची पाहणी केली असता दरवाजा कडीकोयंडा तुटलेला होता. बेडरुममधील कपाट उघडे होते. त्यातील दोन लाख रुपये रोख, १२.५ तोळे दागिने त्यात सहा तोळ्याचे दोन कंगण,४.५ तोळ्याच्या सोन्याच्या बांग्गड्या, एक तोळ्याच्या दोन अंगठ्या, चांदीचे ६० ग्रॅमचे एक कडे रक्कम व दागिने गायब झालेले होते. मागील बाजूने आले चोरटेदर्शनी भागातून वर्दळ असल्याने चोरट्यांनी मागील बाजूने येवून घरात प्रवेश केला. पंधरा ते २० मिनिटात कुलूप, कडी-कोयंडा तोडून व कपाटातील ऐवज त्यांनी लंपास केला. ज्या मार्गाने आले त्याच मार्गाने चोरटे परत गेले. मागील बाजूस तुटलेली इमारत असल्याने तो मार्ग येण्यास सोपा आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पेठ पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. फिंगरप्रिंटही घेण्यात आली. बुधवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.