कोरोनाविरुद्धचा लढा अजून सुरुच, शरद पवार म्हणतात 'हा' व्हिडिओ पाहाच
By महेश गलांडे | Published: October 12, 2020 10:02 AM2020-10-12T10:02:54+5:302020-10-12T10:11:34+5:30
देशात अनलॉक प्रक्रिया सूरू झाली असून सर्वकाही पूर्ववत करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याची कोणतीही आकडेवारी हातात नसताना दिवाळीपर्यंत राज्यात संपूर्ण अनलॉक करणे धाडसाचे पाऊल ठरेल
मुंबई - कोरोनापासून सावधानता बाळगण्यासाठी सरकारतर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. तर, सरपंचांपासून ते पंतप्रधानांपर्यंत अनेकजण कोरोनासंदर्भात आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन अचूक माहिती देत काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनीही सातत्याने ट्विटरवरुन कोरोनाची जनजागृती केली आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी आपली कोरोनाविरुद्धची लढाई अद्याप सुरूच आहे, असे पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे.
देशात अनलॉक प्रक्रिया सूरू झाली असून सर्वकाही पूर्ववत करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याची कोणतीही आकडेवारी हातात नसताना दिवाळीपर्यंत राज्यात संपूर्ण अनलॉक करणे धाडसाचे पाऊल ठरेल, असा सावधगिरीचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिला आहे. दरम्यान, खासदार शरद पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करताना हा व्हिडिओ पाहण्याचं आवाहन नागरिकांना केलंय.
देशातील जनजीवन टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर येत आहे. तरीही आपला #Covid_19 विरुद्धचा लढा अजून सुरू आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. हाच संदेश देणारा व्हिडीओ @WHO ने तयार केला आहे. अवश्य पाहा.#माझे_कुटुंब_माझी_जबाबदारीpic.twitter.com/RBTX39x7ZJ
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 12, 2020
''देशातील जनजीवन टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर येत आहे. तरीही आपला #Covid_19 विरुद्धचा लढा अजून सुरू आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. हाच संदेश देणारा व्हिडीओ @WHO ने तयार केला आहे. अवश्य पाहा, असे पवार यांनी म्हटलंय. तसेच, माझे कुटुंब-माझी जबाबदारी... असा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे. त्यामुळे, नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची गरज आहे. बाजारात किंवा समाजात वावरताना कशी काळजी घ्यायची हेच या व्हिडिओतून सांगण्यात आलंय. तर, बिनधास्तपणा हा धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
अनलॉक करणे धाडसाचे ठरेल
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची दैनंदिन संख्या कमी होत असून मृत्युदरातही घट झाली आहे. तसेच रुग्णवाढीचा दर कमी होत असल्याचे सांगत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण अनलॉक होण्याचे संकेत दिले. कोरोनाचा प्रादुर्भाव येत्या काही दिवसांत आणखी कमी झाला तर दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालये सुरू होऊ शकतील, असेही टोपे यांनी म्हटले होते. टोपे यांच्या या वक्तव्याबाबत आश्चर्य व्यक्त करत डॉ. भोंडवे यांनी सांगितले की, कोरोनाबाबत कोणतेही अनुमान काढण्याइतपत सध्याची परिस्थिती नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे आकडेवारीतून दिसत नाही. तेव्हा अशा परिस्थितीत संपूर्ण अनलॉक करणे धाडसाचे ठरेल. उलट अधिक काळजी घ्यावी लागेल,असेही डॉ. भोंडवे यांनी पत्रकारांना सांगितले.
मुंबईत धोका वाढला
मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या आता २ लाख २७ हजार २७६ एवढी झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना मुंबईत मात्र रोज २,२०० ते २,८०० नवीन कोरोना रुग्ण सापडत आहेत. आतापर्यंत ९,३९१ रुग्णांचे मृत्यू झाले असून रुग्णालयाधीन म्हणजे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही २५,३५८ एवढी झाली आहे.