‘भूसंपादन’विरुद्ध लढा

By admin | Published: April 19, 2015 01:20 AM2015-04-19T01:20:51+5:302015-04-19T01:20:51+5:30

राहुल गांधी यांनी शनिवारी भूसंपादन विधेयकाला आम्ही सर्व शक्तिनिशी विरोध करू आणि हे विधेयक मागे घेण्याची आपली मागणी मान्य करून घेण्यास सरकारला बाध्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.

Fight against land acquisition | ‘भूसंपादन’विरुद्ध लढा

‘भूसंपादन’विरुद्ध लढा

Next

नवी दिल्ली : दोन महिन्यांची आत्मचिंतन रजा आटोपून परतल्यानंतर प्रथमच लोकांना सामोरे जाणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी भूसंपादन विधेयकाला आम्ही सर्व शक्तिनिशी विरोध करू आणि हे विधेयक मागे घेण्याची आपली मागणी मान्य करून घेण्यास सरकारला बाध्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.
राहुल गांधी यांनी किसान रॅलीच्या पूर्वसंध्येला आपल्या निवासस्थानी विविध राज्यांतून आलेले शेतकरी आणि त्यांच्या प्रतिनिधींसोबत दोन सत्रांमध्ये चर्चा केली. विविध मुद्यांवर हितगूज केले आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आपला पक्ष केंद्रातील भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) भूसंपादन विधेयकासह शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित सर्व मुद्यांवर निर्णायक लढा देईल, असे वचन गांधी यांनी यावेळी दिल्याचे पक्ष नेत्यांनी सांगितले. ही लढाई केवळ एक दिवस, एक महिना अथवा एक वर्षात संपणार नाही. शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढे सरकारला नांगी टाकावी लागेल आणि तोपर्यंत हा लढा सुरूच राहील. चर्चेला उपस्थित शेतकरी नेत्यांच्या सांगण्यानुसार, राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या भूसंपादन कायद्याबद्दल त्यांचे विचार जाणून घेतले. याशिवाय अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पिकांचे किती नुकसान झाले आणि सरकारने त्यांच्या उत्पादनांना काय किंमत दिली याबाबतही विचारणा केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)

उद्ध्वस्त पीक दाखविले
बैठकीनंतर राहुल गांधी यांनी बाहेर मोठ्या संख्येने प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली आणि तब्बल ४० मिनिटे त्यांच्याशी हितगूज केले. यावेळी काही शेतकऱ्यांनी त्यांना अवकाळी आणि गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या पिकाचा नमुना दाखविला. कडेकोट सुरक्षा बंदोबस्तातही काही वयोवृद्ध शेतकरी राहुल यांना प्रेमाने जवळ घेत आशीर्वाद देत होते.

..आणि शेतकऱ्यांमध्ये मिसळले राहुल
च्चर्चासत्रासाठी आलेल्या शेतकऱ्यांमध्ये राहुल गांधी मिसळले. त्यांनी आपलेपणाने शेतकऱ्यांशी हितगुज केले. चर्चासत्रादरम्यान हरियाणाच्या भिवानी येथून आलेल्या काही वयोवृद्ध शेतकऱ्यांनी गांधींना त्यांचे लक्ष आपल्याकडे वेधण्याकरिता ‘चौधरी राहुलजी’असे संबोधित केले.
च्रविवारी होणाऱ्या किसान रॅलीत या मुद्यावर सविस्तर बोलण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतला आहे.
च्राहुल गांधी लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित करू शकतात. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरू होत आहे.

च्‘काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासमक्ष शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचा प्रतिध्वनी रविवारी रामलीला मैदानावर ऐकायला मिळेल. सोमवारपासून संसदेचे सत्र सुरू होत आहे.
च्भूसंपादन, पिकांचे नुकसान आदी शेतकऱ्यांचे मुद्दे संसदेत आणि संसदेबाहेरही उपस्थित केले जातील. असे काँग्रेसचे सरचिटणीस शकील अहमद यांनी सांगितले.

च्येथे मोठ्या संख्येत उपस्थित असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत मात्र गांधी बोलले नाही.

Web Title: Fight against land acquisition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.