१० प्रभागात २० विद्यमान नगरसेवकांमध्ये थेट लढत

By admin | Published: February 15, 2017 09:12 PM2017-02-15T21:12:20+5:302017-02-15T21:12:20+5:30

१० प्रभागात २० विद्यमान नगरसेवकांमध्ये थेट लढत

Fight directly between 20 existing corporators in 10 divisions | १० प्रभागात २० विद्यमान नगरसेवकांमध्ये थेट लढत

१० प्रभागात २० विद्यमान नगरसेवकांमध्ये थेट लढत

Next

अमरावती : २१ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत १० प्रभागात २० विद्यमान नगरसेवकांमध्ये थेट लढत होत आहे. प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेमध्ये १० जण निवडून येणार असल्याने १० विद्यमानांचा पराभवही निश्चित आहे. विद्यमान नगरसेवकांमधील या लढती तुल्यबळ होण्याचे संकेत असल्याने राजकीय ज्वर तापू लागला आहे.
प्रभाग १ शेगाव रहाटगावमधील जागेवर शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक राजू मानकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण मेश्राम समोरासमोर ठाकले आहेत. तर विलासनगर मोरबाग प्रभागातील ह्यकह्ण जागेवर शिवसेनेच्या रेखा तायवाडे आणि जनविकास काँग्रेसच्या कुसूम साहू रिंगणात आहेत. साहू यांना यंदा भाजपची उमेदवारी मिळालेली आहे.
प्रभाग ७ मधील ह्यडह्ण जागेवर भाजपचे संजय अग्रवाल आणि अपक्ष दिनेश बुब यांच्यात लढत होईल. प्रभाग ८ मधील ह्यडह्ण जागा जिंक ण्यासाठी अपक्ष अंबादास जावरे आणि कॉंग्रेसचे बबलू शेखावत यांच्या राजकीय लढाई होईल. प्रभाग ९ एसआरपीएफ मधील ह्यअह्ण जागेवर मालती दाभाडे आणि विजय बाभुळकर परस्परांसमोर ठाकले आहेत. तर याच प्रभागातील ह्यकह्ण जागेवर ममता आवारे आणि सपना ठाकूर या विद्यमान नगरसेविका समोरासमोर आहेत. रुख्मिनीनगर-विवेकानंद कॉलनी या प्रभागातील सर्वसाधारण ह्यडह्ण जागेवर हायव्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे. येथे भाजपकडून नितीन देशमुख आणि कॉंग्रेसकडून प्रदीप हिवसे हे विद्यमान नगरसेवक निवडणूक लढत आहेत. राजापेठ -संत कंवरराम प्रभागातील ह्यडह्ण जागेवर राजेंद्र महल्ले आणि अमोल ठाकरे परस्परांसमोर उभे आहेत. महल्ले यांनी युवा स्वाभिमानची उमेदवारी मिळविली तर ठाकरे कॉंग्रेसचे उमेदवार आहेत.
प्रभाग १९ साईनगर ह्यकह्ण या जागेसाठी शिवसेनेच्या तिकीटावर मंजुषा जाधव आणि काँग्रेसच्या तिकीटावर संगिता वाघ नशिब आजमावत आहेत. याशिवाय जुनीवस्ती बडनेरा ह्यबह्ण जागेवर भाजपच्या विद्यमान नगरसेविका छाया अंबाडकर आणि जयश्री मोरे यांनी परस्परांना राजकीय आव्हान दिले आहे. जयश्री मोरे या राकॉफ्रंटच्या नगरसेविका होत्या. मात्र त्या तुर्तास अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. एकुणच विद्यमान सदस्यांच्या लढतीने सदर प्रभागातील निवडणुका चर्चेत आल्या आहेत. प्रचारादरम्यान आरो- प्रत्यारोपाच्यता फैरी झडत आहेत. प्रचारासाठी वेगवेगळे फंडे देखील वापरले जात आहे.

Web Title: Fight directly between 20 existing corporators in 10 divisions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.