सिंग साब! नोकरीसाठी 135 दिवसांपासून मोबाईल टॉवरवर आंदोलन; भरतीचे आश्वासन घेऊनच खाली उतरला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 02:43 PM2021-08-02T14:43:08+5:302021-08-02T14:44:14+5:30

TET pass but no teacher job in Punjab: पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने त्याला खाली आणण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले. परंतू तरी देखील तो खाली उतरत नव्हता. त्याचे हे आंदोलन पाहून शिक्षकाच्या नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांनीही त्याला समर्थन देण्यास सुरुवात केली. 

Fight for the job! Unemployed teacher alights from mobile tower after 135 days in Patiala punjab | सिंग साब! नोकरीसाठी 135 दिवसांपासून मोबाईल टॉवरवर आंदोलन; भरतीचे आश्वासन घेऊनच खाली उतरला

सिंग साब! नोकरीसाठी 135 दिवसांपासून मोबाईल टॉवरवर आंदोलन; भरतीचे आश्वासन घेऊनच खाली उतरला

Next

पटियाला : पंजाबच्या पटियालामध्ये शिक्षकांच्या नोकरीची (Teacher job) मागणी करणाऱा व्यक्ती गेले 135 दिवस मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करत होता. हे आंदोलन त्याने अखेर संपविले आहे. सरकारने ETT आणि TET पास बेरोजगार शिक्षकांच्या मागण्या मान्य केल्यावरच आश्वासन घेऊन आंदोलन थांबविले आहे. (Unemployed teacher alights from mobile tower after 135 days in Patiala)

सुरिंदर पाल सिंग (Surinderpal Singh) असे या आंदोलकाचे नाव होते. सुरिंदरने ETT-टेट परीक्षा पास केली होती. मात्र, बरीच वर्षे झाली तरीदेखील त्याला नोकरी मिळाली नव्हती. कारण भरतीच करण्यात येत नव्हती. यामुळे त्याने मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन सुरु केले. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने त्याला खाली आणण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले. परंतू तरी देखील तो खाली उतरत नव्हता. त्याचे हे आंदोलन पाहून शिक्षकाच्या नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांनीही त्याला समर्थन देण्यास सुरुवात केली. 

यामुळे अखेर राज्य सरकारला नमते घ्यावे लागले. राज्य सरकारने 6600 जागांवर नवीन भरती करण्याची घोषणा केली, तेव्हाच तो खाली उतरला. खाली आल्यानंतर त्याने त्याच्या सहकाऱ्यांसोबत आनंद व्यक्त केला. गेल्या चार महिन्यांपासून उन्हा तान्हात टॉवरवर राहत असल्याने सुरिंदरची हालत खूप खराब झाली होती. त्वचा करपली होती,तसेच पायावर उभेही राहता येत नव्हते.

अधिकाऱ्यांनी अॅम्बुलन्समध्ये त्याला झोपविले आणि हॉस्पिटलला पाठविले. सुरिंदरने सांगितले की, हे खूप वाईट आहे. रोजगारासाठी तरुणांना अशाप्रकारची आंदोलने करावी लागतात. मी शपथ घेतलेली, की माझ्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर खाली उतरणार नाही. 
 

Web Title: Fight for the job! Unemployed teacher alights from mobile tower after 135 days in Patiala punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.