वन रॅँक वन पेन्शनसाठी आता नागपुरातूनही लढा
By Admin | Published: September 4, 2015 10:45 PM2015-09-04T22:45:37+5:302015-09-04T22:45:37+5:30
> : बेमुदत उपोषण नागपूर : युनायटेड फ्रंन्ट ऑफ एक्स सर्व्हिसमेन या संघटनेच्यावतीने वन रॅँक वन पेन्शनसाठी आता नागपुरातही लढा सुरू करण्यात आला आहे. शुक्रवारी अतिशय शिस्तप्रित वातावरणात सकाळी १० वाजतापासून संविधान चौकात बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले. यावेळी संघटनेचे संयोजक संदेश सिंगलकर व चंद्रशेखर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केे ले. मनोहर भातकुलकर व ब्रिगेडीयर सुनील गावपांडे यांचे नेतृत्वात राजू धांडे, श्रीकांत गंगाथडे, विलास दवने व सुनील व्यास यांनी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला बळ देण्यासाठी हे आंदोलन उभे केले आहे. यावेळी मराठा इन्फ न्ट्री ग्रुपचे वाघमारे यांनी १९६१ ते १९७१ पर्यंतच्या विविध युद्धात त्यांनी किती वेदना सहन केल्या शिवाय इतर किती सैनिकांनी प्राणांचे बलिदान दिले, याविषयी माहिती दिली. त्यामुळे केंद्र सरकारने आता सैनिकांच्या संयमाची अधिक प्रतीक्षा न पाहता, लवकरात लवकर वन रॅँक वन पेन्शन लागू करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी विदर्भ राज्य संघटनेचे ॲड़ नीरज खांदेवाले यांनी सैनिकांच्या या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. विशेष म्हणजे, नागपुरात सुरू झालेल्या या आंदोलनामुळे दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनाला नक्कीच बळ मिळणार आहे. दिल्ली ही देशाचे राजकीय केंद्र असले, तरी नागपूर देशाचे भौगोलिक केंद्र आहे. त्यामुळे माजी सैनिकांचे हे आंदोलन आता लवकरच देशव्यापी होणार असल्याचा इशारा यावेळी सिंगलकर यांनी दिला. .........