लष्करासाठी घेणार लढाऊ हेलिकॉप्टर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 06:23 AM2017-08-18T06:23:47+5:302017-08-18T06:23:49+5:30
भारतीय लष्करासाठी ४,१६८ कोटी रुपये खर्च करून सहा ‘अॅपाचे’ लढाऊ हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या प्रस्तावास संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील ‘डिफेन्स अॅक्विझिशन कौन्सिल’च्या बैठकीत गुरुवारी मंजुरी देण्यात आली.
Next
नवी दिल्ली : भारतीय लष्करासाठी ४,१६८ कोटी रुपये खर्च करून सहा ‘अॅपाचे’ लढाऊ हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या प्रस्तावास संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील ‘डिफेन्स अॅक्विझिशन कौन्सिल’च्या बैठकीत गुरुवारी मंजुरी देण्यात आली. प्रभावी युद्धसज्जतेसाठी लढाऊ हेलिकॉप्टर मिळावीत ही लष्कराची फार काळापासूनची प्रलंबित मागणी होती. ही ‘अॅपाचे’ हेलिकॉप्टर मिळाल्यावर लष्करास तशा प्रकारची हेलिकॉप्टर प्रतणच उपलब्ध होतील.
>नौदलाच्या युद्धनौकांसाठी ४९० कोटी रुपये खर्च करून दोन गॅस टर्बाईन खरेदी करण्याच्या प्रस्तावासही ‘डीएसी’ने मंजुरी दिली.