India China Face Off: चीनला धडा शिकवण्यासाठी सीमेवर जवानांची मोर्चेबांधणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 06:26 AM2020-06-18T06:26:16+5:302020-06-18T06:46:08+5:30

प्रचंड तणाव : लडाखमध्ये नौदल, हवाईदल, लष्कर तैनात

Fighters warships moved to forward bases after bloodiest day in Ladakh | India China Face Off: चीनला धडा शिकवण्यासाठी सीमेवर जवानांची मोर्चेबांधणी

India China Face Off: चीनला धडा शिकवण्यासाठी सीमेवर जवानांची मोर्चेबांधणी

Next

- सुरेश डुग्गर 

जम्मू : लडाख भागात चिनी सैन्याशी वाढलेला तणाव पाहून भारतीय लष्कराने तिथे कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाता यावे, यासाठी जोरदार तयारी सुरू केली असून, तिथे इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांच्या असलेल्या चौक्यांवर आता भारतीय जवान तैनात करण्यात आले आहेत. कोणत्याही स्थितीला जशास तसे प्रत्युत्तर देता यावे, यासाठी भारतीय लष्कर आता सज्ज झाले आहे. त्यासाठी काश्मीरमधून जवानांच्या अतिरिक्त तुकड्या लडाखच्या पूर्व भागात पाठवण्यात आल्या आहेत. सोमवारी रात्री झालेल्या तुंबळ हाणामारीत चीनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह ३५ सैनिक मृत वा गंभीर जखमी झाले आहेत.
जिथे तुंबळ हाणामारी झाली, त्या गलवान खोऱ्यात लोकांच्या येण्याजाण्यावर निर्बंध आणण्यात आले आहेत. हवाई दलाची दोन विमानेही आता श्रीनगर तसेच लेहला येऊ न दाखल झाली आहेत.

वाहनांची ये-जा बंद
लेह ते श्रीनगर महामार्गावरील सोनमर्गच्या पुढील रस्ता वाहनांसाठी बंदच केला आहे. या महामार्गावरील गांदरबल, कंगन, गुंड आणि सोनमर्गमध्ये राहणाऱ्यांनी सांगितले की मंगळवारी संध्याकाळपासून तेथून भारतीय जवान सीमेकडे जात असल्याचे दिसत आहेत. गगनगीरमध्ये पोलिसांनी तात्पुरती चौकी उभारली आहे. तिथेच खासगी वाहनांना अडविण्यात येत आहे.

नियंत्रण रेषेवर गस्त सुरू
लष्करी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सोमवारी दोन देशांच्या सैन्यांत संघर्ष झाल्यापासून लडाखच्या पूर्वेकडे कमालीचा तणाव आहे.
लडाखमध्ये चीन व भारत यांच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील आयटीबीपीच्या चौक्या आता लष्कराने ताब्यात घेतल्या आहेत.
तिथे चीनने काही गडबड करू नये, यासाठी आता लष्कराच्या मदतीने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त सुरु आहे.

पेंगाँगमध्येही जादा तुकड्या
पेंगाँग सरोवरातही जवानांनी गस्त वाढविली आहे. सरोवरात लष्कराने अत्यंत आक्रमक पवित्रा ठेवला आहे. तसेच नौदलाची एक तुकडीही सरोवरात येऊ न ठाकली आहे. ही तुकडी गेले १५ दिवस लेहमध्ये होती. ही तुकडी येण्याआधी नौदलाच्या अधिकाºयांनी पेंगाँग सरोवराच्या परिसराची पाहणी केली होती.

एक विशेष तुकडी भरपूर रसद व युद्धसामग्रीसह एएन-३२ विमानाने लेहला रवाना झाली आहे.
वाढत्या तणावामुळे काश्मीरमधील लष्कराचे जवानही लेहकडे गेले आहेत. तिथे पोहोचलेल्या जवानांना सर्व युद्धसामग्री पुरविण्यात आली आहे.

Web Title: Fighters warships moved to forward bases after bloodiest day in Ladakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.