योगगुरू बाबा रामदेव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा, IMA चा तीव्र संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 03:26 PM2021-05-22T15:26:16+5:302021-05-22T15:29:44+5:30

कोरोनावरील उपचार पद्धतीत फॅबीफ्लू आणि स्टेरॉईडसह अन्य अँटीबॉयोटीक्सही फेल ठरल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलंय.

File a case against Baba Ramdev against statement of athology, IMA expresses indignation | योगगुरू बाबा रामदेव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा, IMA चा तीव्र संताप

योगगुरू बाबा रामदेव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा, IMA चा तीव्र संताप

googlenewsNext
ठळक मुद्देविशेष म्हणजे कोविड 19 बाधित रुग्णांचे मृत्यू हे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे न होता, एलोपॅथिक औषधांमुळेच झाल्याचा दावाही बाबा रामदेव यांनी केलाय.

नवी दिल्ली - देशात कोरोना महामारीचं संकट असून योगगुरु बाबा रामदेव यांनी कोरोनावरील उपचारासंदर्भात विधान केलं आहे. यासंदर्भातील रामदेव बाबा यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये, एलोपॅथी उपचारपद्धतीबद्दल त्यांना अविश्वासर्हता दर्शवली आहे. एलोपॅथी ही मूर्ख आणि लंगडे विज्ञान आहे. सर्वप्रथम हायड्रोक्लोरोक्वीन फेल ठरले. त्यानंतर, प्लाझा थेरपी अन् रेमडेसीवीर इंजेक्शनही फेल ठरल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलंय. 


कोरोनावरील उपचार पद्धतीत फॅबीफ्लू आणि स्टेरॉईडसह अन्य अँटीबॉयोटीक्सही फेल ठरल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे कोविड 19 बाधित रुग्णांचे मृत्यू हे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे न होता, एलोपॅथिक औषधांमुळेच झाल्याचा दावाही त्यांनी केलाय. इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांनी केलेल्या दाव्यावरुन संताप व्यक्त केला आहे. तसेच, बाबा रामदेव यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा, अशी मागणीही संघटनेच्यावतीने केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. 

इंडियन मेडीकल असोसिएशनने बाबा रामदेव यांच्या व्हायरल व्हिडिओसंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये, बाबा रामदेव यांनी केलेला दाव स्विकार करुन आधुनिक उपचारपद्धती बंद करावी, अन्यथा बाबा रामदेव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, आपत्ती व्यवस्थापन महामारी कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करावा, असेही मेडिकल असोसिएशन संघटनेनं आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना उद्देशून म्हटलं आहे. 
 

Read in English

Web Title: File a case against Baba Ramdev against statement of athology, IMA expresses indignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.