रेल्वेच्या अधिका-यांवर हत्येचा गुन्हा दाखल करा - केजरीवाल

By Admin | Published: December 13, 2015 05:26 PM2015-12-13T17:26:29+5:302015-12-13T17:26:29+5:30

पश्चिम दिल्लीत शाकूर बस्तीमध्ये शनिवारी रात्री झोपडयांचे अतिक्रमण हटवताना एका सहा महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे.

File a murder case against railway officials - Kejriwal | रेल्वेच्या अधिका-यांवर हत्येचा गुन्हा दाखल करा - केजरीवाल

रेल्वेच्या अधिका-यांवर हत्येचा गुन्हा दाखल करा - केजरीवाल

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १३ - पश्चिम दिल्लीत शाकूर बस्तीमध्ये शनिवारी रात्री झोपडयांचे अतिक्रमण हटवताना  एका सहा महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे. यावरुन दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रेल्वे अधिका-यांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

शनिवारी एका रात्रीत रेल्वेने येथील ५०० पेक्षा जास्त झोपडपट्टया हटवल्या. रेल्वेला इन्फ्रास्ट्रक्चरच्या उभारणीसाठी जमीन हवी असल्याने या झोपडया तोडण्यात आल्या. झोपडयांमध्ये रहाणा-या नागरीकांना तीन नोटीस देण्यात आल्या होत्या. त्यानंतर कारवाई केल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. 
या कारवाई दरम्यान सहा महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप रेल्वेवर करण्यात येत आहे. मुलाचे आई-वडिल झोपडी रिकामी करण्यासाठी सामनाची हलवाहलव करत असताना कपडयांचा ढीग अंगावर पडून मुलाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. केजरीवालांनी या प्रकरणी तिघा अधिका-यांना निलंबित केलं आहे. 

Web Title: File a murder case against railway officials - Kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.