गुलाब नबी आझाद यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 05:09 AM2018-06-30T05:09:51+5:302018-06-30T05:11:12+5:30

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईत दहशतवाद्यांपेक्षा जास्त प्रमाणात नागरिकच ठार होत आहेत, असे उद्गार काढून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी राजद्रोही वर्तन केले आहे

File a sedition charge against Gulab Nabi Azad | गुलाब नबी आझाद यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा

गुलाब नबी आझाद यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईत दहशतवाद्यांपेक्षा जास्त प्रमाणात नागरिकच ठार होत आहेत, असे उद्गार काढून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी राजद्रोही वर्तन केले आहे. त्याबद्दल त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका दिल्ली न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
अ‍ॅड. शशिकांत भूषण यांनी केलेल्या याचिकेत म्हटले की, भारतीय दंड संहितेच्या १२४ कलम (राजद्रोहविषयक), ५०५(१) कलम (नौदल, हवाई दल, भूदलातील अधिकाऱ्यांविरोधात अफवा पसरविणे) व १२० ब कलम यांच्या अन्वये गुलाम नबी आझाद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. जवान काश्मीरमध्ये निरपराध्यांना ठार मारत आहेत, असा समज आझाद यांच्या उद्गारामुळे होऊ शकतो.

Web Title: File a sedition charge against Gulab Nabi Azad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.