बंगाली बाबा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल-२
By Admin | Published: September 4, 2015 11:12 PM2015-09-04T23:12:11+5:302015-09-04T23:12:11+5:30
तेव्हापर्यंत गोळ्याच्या बाहेर यायचे नाही. माझे म्हणणे न ऐकल्यास मृत्यू होऊ शकतो. महिलेने त्याने सांगितल्यानुसार केले. त्यानंतर बाबाने तातडीने पैशाची व्यवस्था करण्यास सांगून गोळ्याच्या बाहेर येण्याला परवानगी दिली. महिलेने आपली स्कुटी विकून तातडीने पैसे जमा केले. परंतु त्यानंतरही मुलगी बरी झाली नाही. तिने पुन्हा फोन केला. तेव्हा तीन म्हशीचा बळी देण्यास सागितले. तेव्हा आपल्याला फसविले जात असल्याचे तिच्या लक्षात आलेे.
त व्हापर्यंत गोळ्याच्या बाहेर यायचे नाही. माझे म्हणणे न ऐकल्यास मृत्यू होऊ शकतो. महिलेने त्याने सांगितल्यानुसार केले. त्यानंतर बाबाने तातडीने पैशाची व्यवस्था करण्यास सांगून गोळ्याच्या बाहेर येण्याला परवानगी दिली. महिलेने आपली स्कुटी विकून तातडीने पैसे जमा केले. परंतु त्यानंतरही मुलगी बरी झाली नाही. तिने पुन्हा फोन केला. तेव्हा तीन म्हशीचा बळी देण्यास सागितले. तेव्हा आपल्याला फसविले जात असल्याचे तिच्या लक्षात आलेे. काही वेळानंतर वीज कंपनीचा एक कर्मचारी उस्मान खान व त्याचा मित्र सौरभ तिच्या घरी आले. त्यांनी तिला धीर दिला आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यालयात नेले. समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेश चौबे, ज्येष्ठ कार्यकर्ते हरीश देशमुख, उत्तम सुळके, नरेश निमजे यांनी यासंदर्भात पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. अखेर ठगबाज बाबाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बाबाला तातडीने अटक करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.