पालिका प्रशासन आणि महापौरांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - राधाकृष्ण विखे-पाटील *बिल्डरहितासाठीच आघाडी सरकारने लागू केलेल्या क्लस्टरची अंमलबजावणी नाही

By admin | Published: August 6, 2015 10:07 PM2015-08-06T22:07:56+5:302015-08-06T22:07:56+5:30

ठाणे : कृष्ण निवास इमारत प्रकरणी महापालिका प्रशासनाने अधिकारी आणि महापौरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात शुक्र वारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाणार असून त्यांनी याबाबत ठोस भूमिका न घेतल्यास आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Filing a criminal case against municipal administration and mayor - Radhakrishna Vikhe-Patil * The government has not implemented the cluster implementation for buildership. | पालिका प्रशासन आणि महापौरांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - राधाकृष्ण विखे-पाटील *बिल्डरहितासाठीच आघाडी सरकारने लागू केलेल्या क्लस्टरची अंमलबजावणी नाही

पालिका प्रशासन आणि महापौरांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - राधाकृष्ण विखे-पाटील *बिल्डरहितासाठीच आघाडी सरकारने लागू केलेल्या क्लस्टरची अंमलबजावणी नाही

Next
णे : कृष्ण निवास इमारत प्रकरणी महापालिका प्रशासनाने अधिकारी आणि महापौरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात शुक्र वारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाणार असून त्यांनी याबाबत ठोस भूमिका न घेतल्यास आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
ठाण्यात गेली २५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे, परंतु येथील धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडविण्यात त्यांना अपयश आले आहे. या ठिकाणी बिल्डर आणि अधिकार्‍यांच्या संगनमताने कोणत्या इमारती धोकादायक आहे, हे ठरविले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. कृष्ण निवास या इमारतीच्या बाबतीतही हाच प्रकार घडला असून ही इमारत धोकादायक नसतानाही ती कोसळली. परंतु, ती पडताच पाठीमागील गणेश दर्शन ही इमारत तत्काळ खाली करण्यात आली. हेच पाऊल जर आधी उचलले असते तर १२ जणांचे प्राण गेले नसते, असेही ते म्हणाले.
आमच्या सरकारने क्लस्टर डेव्हलपमेंट जाहीर केले. परंतु, सध्याचे सरकार त्याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करीत आहे. ते लागू झाल्यास बिल्डर लॉबीचे मोठे आर्थिक नुकसान होईल, त्यांचे हितसंबंध जपण्यासाठीच याची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याचा आरोप त्यांनी केला. आजघडीला ठाण्यात अनेक इमारती जीर्ण आणि धोकादायक स्थितीत आहेत. परंतु, बिल्डरांच्या सांगण्यावरूनच इमारती धोकादायक ठरविल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Filing a criminal case against municipal administration and mayor - Radhakrishna Vikhe-Patil * The government has not implemented the cluster implementation for buildership.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.