बिल्डर डांगरेविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

By Admin | Published: August 26, 2015 12:18 AM2015-08-26T00:18:58+5:302015-08-26T00:18:58+5:30

वकिलाच्या घरावर धाव : जीवे मारण्याची धमकी : दहा लाखांची मागणी

Filing a ransom case against builder Dangre | बिल्डर डांगरेविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

बिल्डर डांगरेविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

googlenewsNext
िलाच्या घरावर धाव : जीवे मारण्याची धमकी : दहा लाखांची मागणी
नागपूर : वकिलाच्या घरात शिरून १० लाखांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली बिल्डर विजय डांगरे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भगवान महादेव लोणारे असे फिर्यादी वकिलाचे नाव आहे. ते न्यू मानकापूरातील अमन गोल्डन पॅलेस, सुगंधी मंगल कार्यालयाजवळ राहतात.
बिल्डर लॉबीचा चटई क्षेत्र निर्देशांक वाढवून देण्याच्या उद्देशाने भूमी अभिलेख कार्यालयाने घेतलेल्या भूमिकेवर आक्षेप घेणारी जनहित याचिका २०१३ मध्ये विशाल खोडेकर यांनी कोर्टात दाखल केली होती. यात लोणारे याचिकाकर्त्यांचे वकील होते. त्यावेळी भूमी अभिलेख कार्यालयाकडून २५ लाख रुपये मिळाल्याचे आरोपी विजय डांगरेला वाटत होते. त्यातून १० लाख रुपये मिळावे म्हणून रविवारी दुपारी २ च्या सुमारास डांगरे आपल्या चार साथीदारांसह लोणारेंच्या घरावर चालून गेला. १० लाखांची खंडणी न दिल्यास जीवे ठार मारू, अशी धमकीही त्याने दिली. लोणारेंनी त्याच दिवशी मानकापूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल केला.
---

Web Title: Filing a ransom case against builder Dangre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.