अडीच हजार रुपये भरा, देशभरात वर्षभर टोलमुक्त प्रवास करा
By admin | Published: July 1, 2015 10:48 AM2015-07-01T10:48:06+5:302015-07-01T10:48:06+5:30
टोलच्या जाचातून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु असून वर्षाला अडीच ते तीन हजार रुपये भरुन देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर टोलमुक्त प्रवास करणे शक्य होणार आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - टोलच्या जाचातून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु असून वर्षाला अडीच ते तीन हजार रुपये भरुन देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर टोलमुक्त प्रवास करण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडला जाणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास केंद्र सरकारच्या तिजोरीवरील भार वाढणार असला तरी वाहनचालाकांना दिलासा मिळू शकेल.
रस्ते वाहतूव व महामार्ग मंत्रालयाचे मंत्री नितीन गडकरी यांनी टोलनाक्यासंदर्भात विविध योजना सुरु करण्याचा प्रयत्न सुरु केला असून टोलनाक्यांवरील रांगामुळे वाया जाणारा वेळ वाचवण्यासाठी वाहनांमध्ये इलेक्ट्रॉनिक चिप लावली जाणार आहे. या चिपमुळे टोलनाक्यांवरुन किती गाड्या जातात हे समजू शकेल. ही चिप लावणा-या खासगी गाड्यांसाठी अडीच ते तीन हजार रुपयांमध्ये वार्षिक पास सुरु केला जाईल, या पासच्या आधारे वाहनचालकांना देशभरातील कोणत्याही टोलनाक्यावरुन मोफत प्रवास करता येईल. हा प्रस्ताव लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडला जाणार आहे. या योजनेमुळे टोलचालकाला फटका बसण्याची चिन्हे असून ही तुट भरुन काढण्यासाठी सरकारी तिजोरीतून तरतूद करावी लागेल.