"बॅग भरा आणि घरची वाट धरा," कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्याची ऑन द स्पॉट हकालपट्टी
By बाळकृष्ण परब | Published: January 12, 2021 11:26 PM2021-01-12T23:26:47+5:302021-01-12T23:27:56+5:30
Manish Sisodia at Labour Office : एका कामचुकार अधिकाऱ्याला दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दणका दिला आहे.
नवी दिल्ली - कर्तव्यात कसूर करणाऱ्या, कामचुकारपणा, दिरंगाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची शासन प्रशासनामध्ये कमतरता नाही. आता अशाच एका कामचुकार अधिकाऱ्याला दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दणका दिला आहे. मनीष सिसोदिया यांनी मंगळवारी उत्तर-पश्चिम दिल्लीतील कामगार कार्यालयाला अचानक भेट दिली. यावेळी बांधकाम कामगारांच्या नोंदणीमध्ये अनियमितता दिसून आली. त्यामुळे सिसोदिया यांनी कार्यालयाच्या व्यवस्थापकाची तडकाफडकी हकालपट्टी केली.
बांधकाम कामगारांच्या नोंदणीमध्ये अनियमितता असल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर सिसोदिया यांनी या कार्यालयाला अचानक भेट दिली. य भेटीवेळी केलेल्या निरीक्षणात डझनभर प्रकरणांमध्ये अनियमितता दिसून आली. मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी संबंधित अधिकाऱ्याला तत्काळ बरखास्त केले. नोंदणीदरम्यान प्रक्रियेचे उल्लंघन करण्यापासून ते कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून महिलेऐवजी पुरुषाचे फोटो लावण्यासारख्या चुका होत असल्याच्या तक्रारी दिसून आल्या.
आज श्रम विभाग के उत्तर-पश्चिम ज़िला मुख्यालय में औचक निरीक्षण किया।
— Manish Sisodia (@msisodia) January 12, 2021
निर्माण श्रमिकों के रेजिस्ट्रेशन में गड़बड़ी करने वाले अफ़सर को तुरंत नौकरी से हटा दिया। उसे अपना बैग उठा कर घर भेज दिया।
जनता के काम में धांधली करने या बाधा डालने वालों की @ArvindKejriwal सरकार में ज़रूरत नही। pic.twitter.com/OY5ISvy6LN
दरम्यान, या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये मनीष सिसोदिया संबंधित अधिकाऱ्याला खडसावताना दिसत आहेत. गरीब लोक रांगेत उभे आहेत आणि तुम्ही इथे पैसे खावून उलट-सुलट काम करत आहात. आता असे करा ती बॅग भरा आणि घरी जावा, असे मनीष सिसोदिया यांना संबंधित अधिकाऱ्याला सांगितले.
दरम्यान, मनीष सिसोदिया यांनी निरीक्षणादरम्यान, कामगार अधिकाऱ्यांना कामगारांची नोंदणी आणि कल्याणासंबंधीची सर्व कामे नियमानुसार आणि निश्चित वेळेत करण्याचे आदेश दिले आहेत.