एच-४ व्हिसाचे वर्क परमीट रद्द होण्याच्या अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:55 AM2018-05-26T00:55:23+5:302018-05-26T00:55:23+5:30
एच-४ व्हिसाचे ठराविक श्रेणीतील कार्य परवाने (वर्क परमीट) रद्द करण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत, असे ट्रम्प प्रशासनाच्या वतीने अमेरिकी न्यायालयात सांगण्यात आले.
वॉशिंग्टन : एच-४ व्हिसाचे ठराविक श्रेणीतील कार्य परवाने (वर्क परमीट) रद्द करण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत, असे ट्रम्प प्रशासनाच्या वतीने अमेरिकी न्यायालयात सांगण्यात आले.
एच-१ बी व्हिसाधारकाच्या वैवाहिक जोडीदारांना अमेरिकेत काम करण्याची संधी देण्यासाठी एच-४ व्हिसा दिला जातो. भारतीय महिला या व्हिसावर मोठ्या प्रमाणात अमेरिकेत नोकऱ्या करतात. बराक ओबामा राष्ट्रपती असताना २0१५ साली हा व्हिसा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. ७0 हजार लोक या व्हिसावर अमेरिकेत काम करतात. हा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने घेतला आहे. ट्रम्प प्रशासनाच्या गृह सुरक्षा विभागाने संघीय न्यायालयात सांगितले की, एच-४ व्हिसाचे कार्य परवाने रद्द करण्याविषयीचा नवा नियम आता अंतिम टप्प्यात आला आहे.